माऊली प्रतिष्ठानच्या गणरायाची उद्या विसर्जन मिरवणूक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माऊली प्रतिष्ठानच्या गणरायाची उद्या विसर्जन मिरवणूक

राहूरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील बस स्टँड परिसरातील माऊली सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गणेशोत्सवाची सांगता उद्या गुरुवार दिनांक ८ सप्टें...

राहूरी फॅक्टरी/वेबटीम:-

येथील बस स्टँड परिसरातील माऊली सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गणेशोत्सवाची सांगता उद्या गुरुवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वा. गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता होणार आहे.

अहमदनगर येथील पद्मनंदन ढोल  पथक या मिरवणूकीचे खास आकर्षण असणार आहे. १०० युवक - युवतींचा सहभाग असलेल्या ढोल - ताशांच्या पथकाच्या निनादात ही मिरवणूक निघणार आहे.

या मिरवणूकीस उद्या गुरुवारी ४ वा. प्रारंभ होणार असून यावेळी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे,युवा नेते हर्ष दादा तनपुरे,शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेशशेठ वाबळे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे,आरपीआय जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन,मातोश्री हॉस्पिटलचे डॉ.रवी घुगरकर,राहुरी अर्बन निधीचे प्रशांत काळे, युवा उद्योजक ऋषभ लोढा,माजी नगरसेवक प्रदीप गरड, दत्ता म्हसे, युवराज पाटील, प्रकाश सोनी,डॉ.संदीप मुसमाडे, आझाद मित्र मंडळाचे संदीप कदम, भाजप शहराध्यक्ष वसंत कदम,शिवचरित्रकार हसन सय्यद आदी उपस्थित राहणार आहे.

तरी या पारंपारिक मिरवणूक सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे मार्गदर्शक किशोर कोबरने, ओमकार कोबरने, अध्यक्ष दिपक तनपुरे, उपाध्यक्ष सागर भालेराव, डॉ.योगेश पगारे,योगेश (विठू) राऊत, गणेश डावखर,आकाश शेटे, चैतन्य इंगळे, अभि घोलप, सनी गायकवाड, ऋषि वरखडे, सत्यम थिगळे,सागर शेळके, अभि जोशी, सर्वेश भंडारी आदींनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत