राहुरी(वेबटीम) राहुरी नगरपालिका शिक्षण मंडळाच्या नूतन मराठी शाळा नंबर 10 सरोदे वस्ती या शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला माजी विद...
राहुरी(वेबटीम)
राहुरी नगरपालिका शिक्षण मंडळाच्या नूतन मराठी शाळा नंबर 10 सरोदे वस्ती या शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला माजी विद्यार्थी शाळा चालवितात हा अनोखा उपक्रम शाळेने राबवला या उपक्रमांतर्गत एकूण 13 माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेऊन शाळेविषयी असलेली प्रेमाची नाळ जपली. या विद्यार्थी शिक्षकांनी सर्व विषयांच्या तासिका अतिशय उत्कृष्टपणे पार पाडल्या.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.नागरे सर सौ.शीला खरात मॅडम व श्रीमती माधुरी राजळे मॅडम हे मान्यवर लाभले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थी शिक्षकांचा पेन-पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाळेतील शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. शाळेची प्रगती पाहून मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सौ दिपाली पतंगे, श्रीमती कल्पना होंडे,सौ.अर्चना रेलकर ,श्री गणेश दारवले ऋषिकेश सूर्यवंशी ,सुमित काळे, तनिष्क सरोदे, चैतन्य सरोदे, निलेश मंचरे ,मंजुश्री खंडागळे, तनुजा खंडागळे , खुशी खंडागळे, अपेक्षा मोरे ,मनीषा कुदनर, वैष्णवी धुमाळ ,सुप्रिया खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत