राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांचे ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांचे वडील शत्रूमर्दन नामदेव त्रिभुवन(वय-६५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवार ८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता तनपुरे कारखाना अमरधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे.
मयत शत्रूमर्दन त्रिभुवन यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, जावई असा मोठा परिवार आहे.
अंत्यत मनमिळाऊ असलेले शत्रुमर्दन त्रिभुवन हे सर्वदूर दादा म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाने राहुरी फॅक्टरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत