देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी व लाख परिसरात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व प्रतापराव दराड...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी व लाख परिसरात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व प्रतापराव दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापे टाकून गावठी दारू नष्ट केली आहे.
आज शुक्रवारी पहाटे ४ ते ७ वाजे दरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार राहुरी पोलीस स्टेशन हद्दतीत देवळाली प्रवरा,फॅक्टरी ,लाख येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर
छापे टाकून एकूण अंदाजे 2000 लिटर रसायन 2500 लिटर हातभट्टी दारू असा एकूण अंदाजे किंमत रु 1,36,400/- किमतीचा माल जप्त व नाश करण्यात आला.
या बाबत सविस्तर गुन्हे नोंद करण्याचे काम सुरू होते.सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्य सुचेनानुसार करण्यात आली असून गणेश विसर्जनच्या सकाळी ही कारवाई झाल्याने विसर्जन मिरवणूक होणारे गैरप्रकार रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारहेडा,ज्योती डोके, रमीज शेख, पोलिस हॅडकोन्स्टेबल प्रभाकर शिरसाठ, श्री. पारधी, श्री.ढाकणे, श्री.पारधी, श्री. लिपणे, श्री.गुणवंत यांनी केली आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत