राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- हिंदू सणाचा जागर करत,राष्ट्रप्रेम जागवत सर्वत्र पार पाडत असलेल्या श्री.दुर्गा माता दौडचे आयोजन राहुरी फॅक्टरी येथे...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
हिंदू सणाचा जागर करत,राष्ट्रप्रेम जागवत सर्वत्र पार पाडत असलेल्या श्री.दुर्गा माता दौडचे आयोजन राहुरी फॅक्टरी येथे देखील आयोजित करणयात आले असून घटस्थापना ते विजयादशमी(दसरा) अर्थात २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर याकालावधीत दररोज सकाळी ६.०० वा. संपूर्ण राहुरी फॅक्टरी परिसरातुन ही दौड निघणार आहे.
दौड श्री स्त्री सन्मानाची,दौड भारतमातेची,दौड शिवछत्रपती,संभाजीमहाराजांच्या नमनाची,दौड हिंदुत्वाची,दौड दुर्गामातेची ह्या उक्तीप्रमाणे राहुरी फॅक्टरी परीसरातील तरुणांनी परीसरातील अनेक भागातुन दररोज दौडचे आयोजन केले आहे.
यात पहिली दौड सोमवार २६ सप्टेंबर रोजी - श्रीरामपूर नाका,दुसरी दौड २७ सप्टेंबर रोजी- ए.डी. सी.बँक ,तिसरी दौड २८ सप्टेंबर रोजी- सेंट्रल बँक,चौथी दौड २९ सप्टेंबर रोजी -येवले क्लासेस,पाचवी दौड ३० सप्टेंबर रोजी - वैष्णवी चौक, सहावी दौड १ ऑक्टोबर रोजी -श्रीरामपूर नाका, सातवी दौड २ ऑक्टोबर रोजी- राजे छत्रपती चौक,आठवी दौड ३ ऑक्टोबर रोजी - प्रसादनगर, नववी दौड ४ ऑक्टोबर रोजी- सुर्यानगर, दहावी दौड ५-ऑक्टोबर रोजी-श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक राहुरी फॅक्टरी, आदी परिसरातून निघणार आहे.
तरी या दुर्गा माता दौमध्ये सर्व पुरुष-महिला, तरुण- तरुणींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत