राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील आनंदऋषीजी महाराज नागरी पतसंस्थेच्यावतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सभासदांना डिव्हिडंट वाटप...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील आनंदऋषीजी महाराज नागरी पतसंस्थेच्यावतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सभासदांना डिव्हिडंट वाटप गुरुवारी सकाळी करण्यात आले.
राहुरी फॅक्टरी येथील आनंदऋषीजी महाराज नागरी पतसंस्थेच्यावतीने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. यंदाही सभासदांच्या पदरात काहीतरी पडावे या हेतूने डिव्हिडंट वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब कोहकडे होते. यावेळी ह.भ.प आदीनाथ महाराज हारदे, शिवसेना शहरप्रमुख विजय गव्हाणे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे संस्थापक ललित चोरडिया यांनी प्रास्तविक केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे चेअरमन विकास महाजन, व्हा.चेअरमन सोपानराव कोहकडे, किशोर पंडीत ,भाऊसाहेब गुंजाळ, प्रमोद वने, तैनुरभाई पठाण, रमेश चोरडिया, गजानन घुगरकर, पारस चोरडिया, शिवाजी शिंदे,गंगाधर शिंदे, आबासाहेब वने,श्री.बनकर,श्री.धाडगे , भारती चोरडिया,श्वेता विजन,रेहना पठाण, मॅनेजर सुरेश बागुल ,अनंत पुरोहित आदींसह सभासद उपस्थित होते.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत