शिक्षण मंडळाची नोकर भरती बेकायदेशीर; सभासद कोर्टात ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिक्षण मंडळाची नोकर भरती बेकायदेशीर; सभासद कोर्टात !

  नगर : वेबटीम                        श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ संपलेला असतानाही केवळ खोके मिळविण्यासाठी...

 

नगर : वेबटीम   

                    श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ संपलेला असतानाही केवळ खोके मिळविण्यासाठी नोकर भरती करण्याचा घाट घातला आहे. कार्यकाल संपलेला असल्याने मावळत्या विश्वस्तनी  घेतलेली ही भरती बोगस असून, ती थांबवावी, आणि मुलांची होणारी फसवणूक रोखावी, यासाठी काही सभासदांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.                            श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे (नोंदणी क्र. एफ 36 ) आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, राहुरी ता. राहुरी जि. अहमदनगर या महाविद्यालयाचे संस्थेचे संचालक/ विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ संपलेला आहे. तसेच सदर संस्थेची मागील निवडणुकी नंतर झालेल्या विश्वस्त मंडळाच्या निवडीबाबत तक्रार अर्ज सहाय्यक धर्मादाय आयुक्त, अहमदनगर तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ येथे विश्वस्त मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमण्याबाबत रिट पिटीशन दाखल केलेली असून त्याचा रि.पि. क्र. WB10332/ 2022 असा असून आज रोजी ती प्रलंबित आहे. वास्तविक पाहता अशा परिस्थितीमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या व कार्यकाळ संपुष्टात आलेल्या विश्वस्त मंडळाने कुठल्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित नाही. तरी सुध्दा सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सध्याच्या विश्वस्त मंडळाने अनधिकृत रित्या व बेकायदेशीर पणे अनेक निर्णय घेऊन संस्थेचे व विद्यार्थी तसेच जनतेचे नुकसान होईल अशाप्रकारे गैरवर्तन केलेले आहे.

दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये असि प्रोफेसर या पदाच्या ९ जागांकरिता भरतीची जाहिरात दिलेली आहे. सदरच्या जाहिरातीतील पदे भरण्याचा कोणताही अधिकार सध्या कार्यकाळ संपुष्टात येऊन बेकायदेशीरपणे अस्तित्वात असलेल्या विश्वस्त मंडळास नाही. तरी सुध्दा सदरच्या विश्वस्त मंडळाने गैर हेतूने बेकायदेशीर पणे भरती प्रक्रिया राबवुन केवळ पेट्यानी खोके भरता यावीत, यासाठी उमेदवारांवर फासे फेकले जात आहेत

 सदरची भरती प्रक्रिया घाई घाईने उरकविण्याचा घाट घातलेला आहे. यामध्ये विश्वस्त मंडळाचा हेतू उघडपणे दिसुन येत आहे. तरी सदर भरती प्रक्रिया नवीन विश्वस्त मंडळ येईपर्यंत थांबवावी, अशी मागणी  रामदास पाटील धुमाळ विचारमंचचे तालुकाध्यक्ष अमृत धुमाळ यांनी न्यायालयाकडे केल्याची माहिती मिळाली.             विश्वस्त मंडळाची मुदत संपलेली असताना ही भरती केली जात आहे, मुळात ही भरती फक्त काही लोकांचे खिसे भरण्यासाठी आहे,  ही भरती बोगस ठरणारी असल्याने त्यात खोके देऊन तरुणांची स्वतःची फसवणूक होऊ नये, या हेतूने अरुण पाटील कडू, पंढरीनाथ तात्या पवार, राजु भाऊ शेटे, संजय पोटे, ॲड पवार भाऊसाहेब आम्ही न्यायालयात धाव घेतली असून, आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे, असे युवानेते अमृत धुमाळ म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत