आंबी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील केसापूर येथील साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनीने 'दुग्ध व्यवसाय किफायतशीर करणेसाठी' हे ब्रीद अंगी...
आंबी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील केसापूर येथील साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनीने 'दुग्ध व्यवसाय किफायतशीर करणेसाठी' हे ब्रीद अंगीकारून दूध व्यवसायात प्रवेश केला आहे.
दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तालुक्यातील तांदुळनेर, गंगापूर, तांभेरे, केसापूर येथे सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर कंपनीने दूध संकलन सुरू केले. आगामी काळात कोल्हार खुर्द, संक्रापुर, आंबी, चिंचोली, पिंपळगाव फुणगी, दवणगाव तसेच कार्यक्षेत्रातील इतरही गावांमध्ये गो पालकांकडून दूध संकलन केले जाणार असल्याची माहिती कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तसेच याप्रसंगी साई प्रवरा कंपनीच्या वतीने कापूस व सोयाबीन खरेदीही सुरू करण्यात आली.
यावेळी दुधाच्या गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त दर, उच्च प्रतीचे पशुखाद्य माफक दरात पुरविणे, दुधाचे पेमेंट वेळेवर देणे, दुधाच्या अनामतीवर जास्त रीबेट देणे, गाय भरण्यासाठी उच्च प्रतीचे सीमेन्स पुरविणे, माफक दरात पशुविमा उतरविणे, दूध उत्पादकांचा अपघाती व आरोग्य विमा माफक दरात उतरविणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देणे, कंपनीमार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या लसी उपलब्ध करून देणे, आधुनिक तंत्रज्ञान वापरून यशस्वी झालेल्या मोठमोठ्या गोठयांना भेटी व अभ्यास दौऱ्यांचे नियोजन आदी विविध सुविधा दूध उत्पादकांसाठी ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापकीय संचालक, विशेष कार्यकारी अधिकारी यांनी दिली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत