आंबी(वेबटीम) श्रीरामपूर तालुक्यातील सह्याद्री ट्रेकर्स परिवार यांच्यावतीने चौथा वर्धापन दिन व स्नेहमेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही व...
आंबी(वेबटीम)
श्रीरामपूर तालुक्यातील सह्याद्री ट्रेकर्स परिवार यांच्यावतीने चौथा वर्धापन दिन व स्नेहमेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला. उपस्थितांना मार्गदर्शन सचिन भांड यांनी सांगितले की, सह्याद्री ट्रेकर्सच्या माध्यमातून भटकंती कडून इतिहाच्या पाऊलखुणा शोधण्याचे काम सुरु आहे. इतिहास सर्वांनीच अनुभवला पाहिजे. त्यातच जीवनाचे सार्थक आहे. तसेच पुढील काळात भटकंती बरोबरच आदिवासी मुलांसाठी मदतीचा हात देण्याचा सह्याद्री परिवाराचा मानस असल्याचे भांड यांनी सांगितले.
यावेळी प्रोजेक्टरद्वारे सह्याद्री परिवाराचा आजवरचा गड किल्ल्यांवर झालेला प्रवास आणि सामाजिक कार्याबद्दल माहिती सचिन चंदन यांनी दिली. त्यानंतर सह्याद्री परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले कोविल खेमनार, मंगेश खेमनार, श्री. आसने यांनी परिवाराच्या वतीने कराड सांगली पूरग्रस्त भागात मदत पोहचवली होती तिथे बा रायगड परिवाराच्या सोबत जनावरांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर आयोजन करण्यात आले होते त्या साठी त्यांनी भरगोस औषधे पुरवली होती.
याप्रसंगी डॉ. रवींद्र महाडिक, रणरागिनींना सह्याद्री परिवारासोबत जोडून दुर्ग भ्रमंती करायला लावणाऱ्या संजीवनी गोसावी यांचा विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले. सह्याद्री परिवाराचा मुख्य उद्देशच ग्रामीण भागातील तरुण पिढीला विशेषतः शिवप्रेमीना महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि त्यांचा इतिहास आत्मसात करता यावा हा प्रमुख उद्देश असून त्यादृष्टीने सह्याद्री परिवार प्रयत्न करत आहे असे सचिन चंदन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन भांड, सूत्रसंचालन सचिन चंदन तर आभार उमेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण पाळंदे, श्रीकांत दहीमीवाळ, लक्ष्मण चौधरी, अभिषेक चतुरे, अभिजित गोसावी आदींनी विशेष परिश्रम घेतले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत