देवळाली प्रवरा- जातप रोडवरील ह्या' भागात बिबट्याचा चिमुरड्यावर हल्ला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा- जातप रोडवरील ह्या' भागात बिबट्याचा चिमुरड्यावर हल्ला

देवळाली प्रवरा/वेबटीम:- शेतात घास कापण्यासाठी आई-वडिलांसोबत गेलेल्या १३ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला चढवित त्यास गंभीर जखमी केल्याची घ...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

शेतात घास कापण्यासाठी आई-वडिलांसोबत गेलेल्या १३ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला चढवित त्यास गंभीर जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा व जातप रोडवरील येथील गडाख व खांदे वस्ती परिसरात घडली असून चिमुरड्यावर  नगर येथील सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, देवळाली प्रवरा व जातप रोड येथील गडाख व खांदे वस्ती परिसरातील आदिनाथ बोंबले व  त्यांच्या पत्नी व त्यांचा मुलगा मयूर बोंबले हे आज रविवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान शेतात घास कापण्यासाठी गेले असता घास कापत असतानाच शेतात लपून असलेल्या बिबट्याने मयूर ह्याच्यावर झेप घेऊन हल्ला चढविला. बिबट्याच्या हल्ल्यात मयुरच्या मानेला गँभीर मार लागला.बिबट्याचा मयूरवर हल्ला होताच त्याचे आई,वडील मदतीसाठी धावले व आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली.

जखमी मयूर यास तातडीने नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

दरम्यान बोंबले कुटुंबीय हे अतिशय गरीब असून वनविभागाने तसेच परिसरातील विविध सामाजिक संघटनांनी त्यांना मदत करण्याची गरज आहे. तसेच परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून पशु-जनावरे यांच्यावर हल्ले होत असतानाच आता मानवावर हल्ले वाढत तातडीने पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत