देवळालीतील डि.एम.सीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कष्टाला व घामाला न्याय - माजी आ.चंद्रशेखर कदम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळालीतील डि.एम.सीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कष्टाला व घामाला न्याय - माजी आ.चंद्रशेखर कदम

देवळाली प्रवरा(वेबटीम):- देवळाली प्रवरा  येथिल डी एम सी दूध संकलन  व शितकरण केंद्र उद्योग समूहाचे अध्यक्ष तरुण उद्योजक अजित चव्हाण यांनी दिव...

देवळाली प्रवरा(वेबटीम):-

देवळाली प्रवरा  येथिल डी एम सी दूध संकलन  व शितकरण केंद्र उद्योग समूहाचे अध्यक्ष तरुण उद्योजक अजित चव्हाण यांनी दिवाळीच्या सणानिमित्ताने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ठेव व रिबेटचे ५१ लाख २० हजार ९९९ रुपयांचे एका क्लीकवर माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वाटप करुन ख-या अर्थाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला व घामाला न्याय दिला असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांनी केले.


सालाबादप्रमाणे यंदाही डी एम सी दूध संकलन व शितकरण केंद्राचे वतीने येथिल शांताबाई कदम सांस्कृतिक सभागृहात दूध उत्पादकांना ठेव व रिबेटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शिंदे बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम, डॉ. तनपुरे कारखान्याचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस,दैवत उद्योग समूहाचे अध्यक्ष केशवराव शिंदे, भैरवनाथ दूध शितकरण केंद्राचे अध्यक्ष पियुष शिंदे,राहुरी तालूका दूध संघाचे अध्यक्ष तान्हाजी धसाळ, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, मुरलीधर कदम,सचिन ढुस, सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र ढुस,बबनराव पटारे,धोंडीभाऊ मुसमाडे, शहाजी कदम,  अमोल कदम, नामदेव चव्हाण, मुख्याधिकारी अजित निकत,नितीन खांदे,उदय साबळे,अरुण भालके,आराध्या मिल्कचे श्री.टेकाळे,श्री. दरंदले, अहीलाजी दराडे आदीसह डी एम सी उद्योगसमूहाचे अध्यक्ष अजित चव्हाण उपस्थित होते.



यावेळी बोलतांना माजी आमदार चंद्रशेखर कदम म्हणाले, डी एम सी ने लावलेल्या या रोपट्याचे लवकर वटवृक्षात रुपांतर होवो व अशाच प्रकारे दूध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होवो असे सांगून त्यांनी सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.


माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले, दूधातील भेसळ बंद झाली तर आज ही दूध उत्पादकाला ५० रुपये लिटरचा भाव मिळू शकतो. या बाबत दूध उत्पादकांनी साथ दिल्यास सरकार यातून नक्कीच मार्ग काढू शकते.


दैवत उद्योग अध्यक्ष केशवराव शिंदे म्हणाले,दूधाच्या ब्रांण्डीगच्या विषयावर काम झाले पाहिजे. योग्य खाद्य गायींना देऊन जास्त दुधाच्या गाई तयार केल्या पाहिजेत. भविष्यात दूधाला अच्छेदिन येणार आहेत.



 यावेळी शरद उ-हे यांनी वर्षभरात ६१ हजार लिटर दूध पुरवठा करुन प्रथम क्रमांक मिळवला त्यांना ९२ हजार रुपये ठेव व रिबेट मिळाले तर चंद्रशेखर रमेश पाटील यांनी ५१ हजार लिटर दूध पुरवठा करुन दुसरा क्रमांक मिळवला त्यांना ७५ हजार रुपये ठेव व रिबेट मिळाले व अमोल ढुस यांनी ४९ हजार लिटर दूध पुरवठा करुन तिसरा क्रमांक पटकावला त्यांना ७३ हजार रुपये ठेव व रिबेट मिळाले. तिघांच्या  सौभाग्यवतींंना पैठणी व सन्मान चिन्ह देऊन तिघांचा सपत्निक सन्मान करण्यात आला. 


तसेच ३० हजार लिटर पेक्षा जास्त दूध पूरवठा करणारे गणेश माळवदे,शरद कडू,विकास वर्पे,गणेश कडू,बाबासाहेब भांड,दत्तात्रय डुक्रे,धनंजय सिनारे,शुभम मुसमाडे यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी मंगेश ढुस यांचा डि एम सी च्या वतीने चंद्रशेखर कदम यांनी सन्मान केला. भाजयुमोच्या वतीने गणेश उत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या कथा स्पर्धेत लावण्या खामकर या इयत्ता ५ वीतिल विद्यार्थीनीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिला चंद्रशेखर कदम, सत्यजित कदम यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  सायकल बक्षिस देण्यात आली.


यावेळी सोसायटी संचालक दिलीप मुसमाडे, सुधिर टिक्कल, उत्तम मुसमाडे, भाऊसाहेब वाळुंज, संतोष चव्हाण,अभिजित कदम, सुदाम भांड, सचिन शेटे, अनिल पठारे, श्री.साठे, आण्णा महाकांळ, भागवत कदम,बाजीराव चव्हाण,राजेंद्र तरस,सागर भालेकर,विनायक चव्हाण, अभय चव्हाण, चेतन कदम आदीसह दूध उत्पादक उपस्थित होते. डी एम सी च्या वतीने दूध उत्पादकांची सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रास्ताविक राजेंद्र चव्हाण यांनी केले. आभार शहाजी कदम यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदक श्रीकांत जाधव यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत