राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- आरोग्य, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व कौटुंबिक जीवनात उल्लेखनीय कार्याबद्दल जय युवा अकॅडमी, अहमदनगर यांच्य...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
आरोग्य, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व कौटुंबिक जीवनात उल्लेखनीय कार्याबद्दल जय युवा अकॅडमी, अहमदनगर यांच्या वतीने आयोजित कोहिनूर मंगल कार्यालय येथे गुरुवार दि. १३ ऑक्टोबर रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सौ.भागीरथी बाई तनपुरे कन्या माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय राहुरी येथील पर्यवेक्षिका सौ.प्रमिला शंकर गावडे पर्यवेक्षिका, यांचा ट्रॉफी सन्मानपत्र व पैठणी देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सिने चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर, जेष्ठ विधितज्ञ प्रशांत साळुंखे ,संजय गवारे (संकल्प युवा फाउंडेशन राज्य क्रीडा मार्गदर्शक) सौ थोरात मॅडम ( लावणी साम्राज्ञी )जय युवा अकॅडमी चे मुख्य संयोजक ॶॅड. महेश शिंदे व सचिव सौ. जयश्री शिंदे, सहसंयोजक पोपटराव बनकर, संघर्ष नामाचे संपादक भीमराव उल्हारे, सुनील मतकर साहेब (सरचिटणीस शिक्षक भारती संघटना, पाथर्डी)जेष्ठ तुरंगाधिकारी दशरथ जठार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले.
सौ. प्रमिला शंकर गावडे यांचे मा.खा. प्रसाद तनपुरे,आमदार प्राजक्त तनपुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष अरुण तनपुरे, उषाताई तनपुरे,सुजाताताई तनपुरे व श्री बाबुराव बापुजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्था प्रशासन अधिकारी गायकवाड साहेब,मुख्याध्यापिका सौ.शेडगे मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक वर्ग तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी सौ गावडे यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत