राहुरी/वेबटीम:- जिल्हा बँके सेवा संस्थेच्या सभासदांना जे मध्यम मुदतीचे कर्ज देते त्या कर्जाचे व्याज दर कमी करण्याची मागणी माजी खासदार प्रस...
राहुरी/वेबटीम:-
जिल्हा बँके सेवा संस्थेच्या सभासदांना जे मध्यम मुदतीचे कर्ज देते त्या कर्जाचे व्याज दर कमी करण्याची मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे ह्यांनी केली.
श्री प्रसाद तनपुरे हे राहुरी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या लाभांश वाटप प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रदीप भास्कर भुजाडी होते. यावेळी प्रेरणा समूहाचे संस्थापक सुरेश वाबळे,संस्थेच्या व्हॉइस चेअरमन सौं ज्योती विलास तनपुरे जेष्ठ संचालक बाबासाहेब मुंजाबा तनपुरे उपस्थित होते.
श्री तनपुरे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की संस्थेचे मार्गदर्शक माजी चेअरमन कै भास्कर पाटील भुजाडी ह्यांचे पश्चात विद्यमान संचालक संस्थेचा कारभार काटकसरीचा व पारदर्शी असा सुरु आहे.जिल्हा बँकेने इतर राष्ट्रीकृत बँके प्रमाणे मध्यम मुदतीचे व्याज दर कमी करावा.येणारा निम्मा वसूल कर्ज खात्यात भरून घ्यावा. युवकांना वेगवेगळ्या व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन द्यावे.पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतकऱ्यांचे हाताशी आलेल्या कपाशी सोयाबीन सारखी पिकांचे अतिशय नुकसान होत आहे. संस्थेच्या संचालक मंडळाने काटकसरीने कारभार करून संस्थेच्या उत्पन्नात दोन पैसे येतील ह्या दृष्टीने कारभार करावा.
संस्थेचे जेष्ठ संचालक बाबासाहेब तनपुरे ह्यांनी संस्थेच्या कारभाराची माहिती देताना सांगितले की संस्थेचे शेअर्स भांडवल 1,33,71,655 रुपये असून संस्थेने नफा वाटणी करताना सभासदांना 6 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला असून त्याची एकूण रक्कम 8,02299.30 इतकी देण्यात येणार आहे तर संस्थेच्या कर्मचाऱ्यांना बोनस व जादा मेहनतना 1,59,798 रुपये देण्यात आला आहे.यावेळी संस्थेचे जेष्ठ सभासद विट्टल नाना वराळे, मधुकर शेळके, शिवाजी रामनाथ वराळे, ज्ञानदेव वराळे आदिना प्रातीनिधीक स्वरूपात लाभांश देण्यात आला.संस्थेच्या कार्यलयात लाभांश वाटपाचे काम सुरु करण्यात आला.
यावेळी सुरेश वाबळे ह्यांनी मार्गदर्शन केले.संस्थेचे जेष्ठ संचालक बाबासाहेब तनपुरे ह्यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी संस्थेचे संचालक दिनकर प्रभाकर पवार, गोरक्षनाथ उंडे, भाऊसाहेब यशवंत वराळे, चंद्रकांत (राजेंद्र )गणपत उंडे, छबुराव सुधाकर तनपुरे, रावसाहेब यादवराव तनपुरे, श्रीकांत अण्णासाहेब ठोकळे विट्टल गंगाधर तमनर, दिपक गुणाजी मेहेत्रे, सौं वैशाली रवींद्र कोरडे, प्रभारी सचिव किरण कोरडे दत्तात्रय गाडेकर, प्रकाश येळे, गीता नेवासकर आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत