शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे व्याख्यान संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे व्याख्यान संपन्न

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  आज सामाजिक न्याय विभागाच्या 90 वा वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर येथे सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या सभागृहात आज शुक्रव...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 आज सामाजिक न्याय विभागाच्या 90 वा वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर येथे सामाजिक कार्य महाविद्यालयाच्या सभागृहात आज शुक्रवार दि. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वा. शिवचरित्रकार हसन सय्यद यांचे व्याख्यान संपन्न झाले.

      कार्यक्रमाला उपस्थित अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. श्री. पंकज जावळे साहेब, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. राधाकृष्ण देवढे साहेब, समाज कल्याण जात-पडताळणी आयुक्त आमीना शेख, जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र ठाकूर, साहित्यिक सुभाष सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते, 

          शिवचरित्रकार हसन सय्यद यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितीतांचे मने जिंकली तर महिलांचे हक्क आणि अधिकार, तरुण युवकांच्या हाती सक्षम राष्ट्र निर्मिती या विषयावर शिवकाळातील अनेक प्रसंगाचे दाखले देत प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले,     

           शिवव्याख्येते हसन सय्यद व्याख्यान दरम्यान कवितेच्या माध्यमातून श्रोत्यांच्या टाळ्यांचा कडकडाट हा सभागृहातील मंचावर उपस्थित मान्यवरांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य टिपत होते.

 

     कार्यक्रमाला उपस्थित महानगरपालिका, जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्माचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत