श्रीरामपूर (प्रतिनिधी) दर्जेदार अध्यापनाच्या माध्यमातून शालेय पातळीवरच विद्यार्थ्यांमध्ये उज्वल भविष्याचा वेध घेण्याचे कसब रुजवून श्री अजिज...
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
दर्जेदार अध्यापनाच्या माध्यमातून शालेय पातळीवरच विद्यार्थ्यांमध्ये उज्वल भविष्याचा वेध घेण्याचे कसब रुजवून श्री अजिज शेख सर यांनी सुसंस्कारीत आणि सर्व गुणसंपन्न विद्यार्थ्यांची फळीच उभी केली. विद्यार्थी घडवता घडवता संवेदनशील नागरिक घडवून राष्ट्र निर्माण आणि मनुष्यनिर्माणाचे पवित्र कार्य त्यांनी केले असे प्रतिपादन अहमदनगरच्या निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवीताई निर्मळ यांनी केले.
यशवंत विद्यालय पढेगावचे पर्यवेक्षक श्री अजिज शेख सर यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता सोहळ्यात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र वित्त व लेखाचे सेवानिवृत्त संचालक श्री बाळासाहेब रामनाथ घोरपडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून योकोहामा टायर्स प्रकल्प, दहेज, गुजरातचे जनरल मॅनेजर श्री. एम. एल. पटेल, अगस्ती महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर मेहजबीन सय्यद, रयतचे उत्तर विभागाचे माजी उपविभागीय अधिकारी श्री. आर. जी. झडे आणि प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉक्टर महेंद्र शेलार हे हजर होते.
यावेळी श्री शेख यांचा गौरव चिन्ह, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. सर्वच वक्त्यांनी श्री अजीज शेख यांच्या उत्कृष्ट अध्यापन पद्धती आणि प्रामाणिक संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याच्या शैलीचा गौरव केला. श्री शेख यांच्या ३३ वर्षांच्या निष्ठावंत, निष्कलंक सेवेचा आढावा सर्वच वक्त्यांनी घेतला.
या कार्यक्रमास यशवंत विद्यालय पढेगावच्या स्थानिक स्कूल कमिटीचे श्री अच्युतराव बनकर, श्री अण्णासाहेब बनकर,श्री बापूसाहेब काळे, श्री शिवाजीराव लबडे, युवा उद्योजक श्री जितेंद्र तोरणे, प्राध्यापक राजेंद्र पटारे, श्री आंबेकर अनेक रयत सेवक तसेच मेजर भाऊसाहेब घोरपडे, गणेशचे संचालक सूर्यकांत निर्मळ, माजी विद्यार्थी आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय आढाव यांनी केले. सूत्रसंचालन श्री राजेंद्र धरम यांनी केले तर आभार सौ. दीपा आंबेकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत