राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असून विविध धार्मिक सामाजिक सांस्...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असून विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहे. आज शनिवार १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता कै. गुलाबराव राणूजी मोढवे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय भारूडकार तसेच मुंबई दूरदर्शन तसेच झी टॉकीज फेम हमीद सय्यद यांचे विनोदी भारुडाचा रंगी कार्यक्रम संपन्न होणार आहे.
तरी पंचक्रोशीतील माता,भगिनी भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, सभासद, कार्यकर्त्यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत