राहुरी/वेबटीम:- येथील जिव्हाळा ग्रुप यांच्या वतीने आज २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली तसेच त्यानिम...
राहुरी/वेबटीम:-
येथील जिव्हाळा ग्रुप यांच्या वतीने आज २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली तसेच त्यानिमित्ताने येथील आदिनाथ वसाहत व गुरुकुल वसाहत येथील सफाई कामगारांचा सन्मान देखील करण्यात आला.
प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तैनूरभाई पठाण हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र बोरुडे यांनी केले तर राधाकीसन पवार,तैनूरभाई पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आदिनाथ वसाहत, गुरुकुल वसाहत व समर्थनगर येथील व्यावसायिकांनी व रहिवासी यांनी जयंतीच्या निमित्ताने जिव्हाळा ग्रुप ची स्थापना केली. तैनूरभाई पठाण, राधाकिसन पवार, संजय राजगुरू, अतुल कराड, विजय अहिरे, डॉ अनिल भाग्यवान, बाळासाहेब गिरी, राजेंद्र बोरुडे, रवींद्र डोखे, अभिजित आहेर, विजय ठोंबरे, गजानन घुगरकर, सचिन लोखंडे, सुधाकर लोंढे, निखिल गिरी, शहाबाज पठाण आदींच्या संकल्पनेतून जिव्हाळा ग्रुप ची स्थापना करण्यात आली आहे.
आज दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त 'स्वच्छतेतुन समृद्धीकडे' हा संदेश देत देवळाली प्रवरा नगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांचा मिठाई व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी ललित चोरडिया, दीपक गांधी, तुकाराम घुगरकर, खडककर सर ,संतोष हारदे, विजय येवले, अनिल लाहुंडे, शेखर शिंदे, रोहिणी लाहुंडे, कविता सरोदे, अलका लाहुंडे आदींसह नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिजित आहेर यांनी केले तर निखिल गिरी यांनी आभार प्रदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत