स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देवळाली प्रवरा नगरपरिषद महाराष्ट्रात 'या क्रमांकावर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देवळाली प्रवरा नगरपरिषद महाराष्ट्रात 'या क्रमांकावर

  देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील देवळाली प्रवरा नगरपरिषदेला 'क' वर्ग नगरपरिषदेत केंद्र शासनाचे गृहन...

 देवळाली प्रवरा/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील देवळाली प्रवरा नगरपरिषदेला 'क' वर्ग नगरपरिषदेत केंद्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत पश्चिम भारत विभागात ३ रा व महाराष्ट्रात ३ रा क्रमांक मिळाला आहे. या शिवाय गारबेज फ्री सिटीमध्ये थ्री स्टार मानांकन व ओडिफ ++ मानांकन जाहीर झाले आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार खात्याकडून दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित करण्यात येते.

यासाठी कचरा डेपोमध्ये येणाऱ्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे पुनर्वापर व नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती याबाबत   पाहणी केली जाते. तसेच घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा 100 टक्के संकलन , प्लॅस्टीक बंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी, ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध मोहिम याबाबत पाहणी केली जाते.



 देवळाली प्रवरा शहरातील एकूण स्वच्छता, कचरा संकलन, वाहतूक व प्रक्रिया शहरातील स्वच्छता गृहे यांची पहाणी व दे. प्र. नं.प ने राबविलेले स्वच्छते विषयक उपक्रम याची नोंद घेऊन गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत पश्चिम भारत विभागात ३ रा व महाराष्ट्रात ३ रा क्रमांक मिळाला आहे. या शिवाय गारबेज फ्री सिटीमध्ये थ्री स्टार मानांकन व ओडिफ ++ मानांकन जाहीर झाले आहे.



सर्व नागरिकांच्या सहकार्याने  देवळाली प्रवरा नगरपरिषद कचरामुक्त करण्यात यश आले आणि हे सर्व श्रेय शहरातील जनतेला जाते.कारण देवळालीच्या जनतेने मनामध्ये निर्धार केला होता. देवळाली प्रवरा शहर देशपातळीवर गौरविण्याची परंपरा कायम रहावी यासाठी सर्व कष्ट व परिश्रम  जनतेने घेतले आहे. त्यामुळे याचे सर्व श्रेय  नागरिकांना व पालिका कर्मचाऱ्यांना आहे. प्रांताधिकारी डॉ.अनिल पवार यांचेही यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन लाभले त्यामुळे त्यांचे तसेच देवळालीच्या नागरिकांचे व पालिका अधिकारी व कर्मचारी यांचे मनापासून अभिनंदन करतो असे मुख्याधिकारी अजित निकत म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत