राहुरी पोलिसात डिग्रस येथील एकावर गुन्हा दाखल. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी पोलिसात डिग्रस येथील एकावर गुन्हा दाखल.

  देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवराचे आप्पासाहेब ढुस यांच्या घरात बळजबरीने घुसून जीवे मारण्याची धमकी देत गळ्यातील सोन्याची साखळी लंपास क...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



देवळाली प्रवराचे आप्पासाहेब ढुस यांच्या घरात बळजबरीने घुसून जीवे मारण्याची धमकी देत गळ्यातील सोन्याची साखळी लंपास केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात डिग्रस येथील एकाविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 याबाबत देवळाली प्रवरा येथील आप्पासाहेब भीमराज ढुस यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीत म्हंटले की,  डिग्रस येथील दत्ता सोपान पटेकर याने ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता माझ्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. तुझ्यावर खोटा अट्रोसिटीचा दाखल करतो असा दम दिला व गळ्यातील ९० हजार रुपये किंमतीची ३ तोळे वजनाची सोन्याची साखळी घेऊन गेला.



याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आप्पासाहेब ढुस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्ता सोपान पटेकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३२८,४५२,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घटनेचा आधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाठ करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत