राहुरीचे तहसीलदार एफ. आर.शेख यांनी शेतकऱ्यांना केले महत्वाचे आवाहन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीचे तहसीलदार एफ. आर.शेख यांनी शेतकऱ्यांना केले महत्वाचे आवाहन

  राहुरी(वेबटीम)  सन 2022- 2023 या वर्षाकरिता गाव नमुना नंबर 7 व 12 मध्ये पिकपाहणी नोंदविणेची प्रक्रिया दिनांक 01 ऑगस्ट 2022 रोजीपासुन मोबाई...

 राहुरी(वेबटीम)

 सन 2022- 2023 या वर्षाकरिता गाव नमुना नंबर 7 व 12 मध्ये पिकपाहणी नोंदविणेची प्रक्रिया दिनांक 01 ऑगस्ट 2022 रोजीपासुन मोबाईलमधील ई पिक पाहणी व्हर्जन 2 च्या माध्यामातुन सुरु झालेली आहे. सदरचे अॅप हे आपल्या मोबाईलमधील प्लेस्टोअर वर ई पिक पाहणी व्हर्जन 2 म्हणुन आहे. तरी सर्व शेतकरी खातेदार यांनी लवकरात लवकर आपल्या मोबाईलमधुन आपल्या पिकाची नोंद करुन घ्यावी. पिक पाहणी करिता अंतिम मुदत दिनांक 15 ऑक्टोंबर 2022 पर्यत आहे अशी माहिती राहुरीचे तहसीलदार एफ.आर शेख यांनी दिली


 तहसीलदार शेख यांनी म्हंटले की, सर्व शेतकरी खातेदार यांनी विहित मुदतीत सन 2022-23 या वर्षाचा पिक पेरा नोंदवावा. जेणेकरुन शासनाच्या विविध प्रकारच्या योजना उदा. कृषी व फलोत्पादन, नैसर्गिक आपत्ती नुकसान, पिक विमा, शासकीय आधारभुत किंमत धान्य खरेदी योजना, खतांवरील सबसिडी इत्यादी योजनांचा फायदा घेता येईल. याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास संबंधित गावाचे तलाठी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार शेख यांनी केले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत