राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- न्यायपालिकेवर आमचा पूर्ण विश्वास असून प्रहार चे कार्य ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करून थांबणार नाही. अशी प्रतिक्रिय...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
न्यायपालिकेवर आमचा पूर्ण विश्वास असून प्रहार चे कार्य ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करून थांबणार नाही. अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी त्यांचेवर राहुरी पोलिस ठाण्यात १२ तारखेला रात्री दाखल झालेल्या अट्रोसिटीच्या खोट्या गुन्ह्याबददल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रीया देताना सांगितले.
११ तारखेलाच सदर इसमाने माझे घरी येऊन मला जीवे मारण्याची व ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल ११ तारखेलाच संध्याकाळी देवळाली पोलीस ठाण्यात मी रीतसर तक्रार दाखल केलेली असल्याने १२ तारखेच्या रात्री म्हणजे २४ तासानंतर सदर इसमाने ॲट्रॉसिटीचा आमचेवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामूळे हा खोटा गुन्हा आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्याची गरज नाही.
पुढे बोलताना ढूस म्हणाले की, एखाद्या बांधकाम ठेकेदाराला रीतसर करारनामा करून काम दिलेले असताना व त्याबद्दल सर्व आर्थिक व्यवहाराचे कागदपत्र उपलब्ध असताना त्याने ॲट्रॉसिटी सारख्या कायद्याचा गैरवापर करणे संशयास्पद वाटते.
हा खोटा गुन्हा दाखल करून आमच्या सामाजिक कार्याला खीळ घालण्याचा हा प्रयत्न असून या पाठीमागे ५६ गुंठे जमिनीचा घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील प्रसादनगर मधील जमीन तेथील दलित बांधवांच्या नावावर करून देण्यासाठी आम्ही उभारलेला लढा थांबविण्यासाठी सुद्धा हा केविलवाना प्रयत्न असू शकतो. असा आमचा संशय आहे.
कारण वरील दोन्हीही विषय आम्ही नुकतेच कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पटलावर मांडलेले आहेत. व त्यामुळे या जमीन घोटाळ्यातील भू-माफिया दुखावल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर आम्ही खरच गुन्हेगार असतो तर आमचेवर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या या ठेकेदाराला दोन वर्षांपूर्वी काम देतानाच आम्ही जात पाहून काम दिले असते. आम्ही त्याच्याबरोबर कामाचा लेखी करारनामा केलाच नसता. आम्ही त्याला जात पाहून नव्हे तर कुशल कारागीर आहे अशी शिफारस इंजिनिअर यांनी केल्यामुळे काम दिले होते.
नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील १५ दलित कुटुंबांवरील अन्यायाला वाचा फोडून त्यांना आम्ही वीज देवून न्याय मिळवून दिल्याने त्यांची कित्येक वर्षांपासून पडीक असलेली शेती ओलिताखाली आली आहे. त्याचबरोबर देवळाली प्रवरातील प्रसादनगर भागात तब्बल ४० वर्षानंतर आमच्या आंदोलनाने तेथील नागरिकांना हक्काचे पिण्यासाठी पाणी मिळवून दिले. आणि आता प्रसादनगरची जागा तेथील दलित बांधवांच्या नावावर करून देण्यासाठी आमचा लढा निर्णायक वळणावर असताना कोणालातरी हाताशी धरून आमच्यावर असे खोटे अट्रोसिटी चे गुन्हे दाखल करणे कोणालाही पटण्यासारखे नाही.
न्यायपालिकेवरती आमचा पूर्ण विश्वास असून पोलीस प्रशासन योग्य तो तपास करणार आहेत.
त्यामुळे तपासांती काय ते स्पष्ट होईल.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगले काम करणाऱ्या लोकांवर चिखल फेक आणि खोटे गुन्हे दाखल करून प्रतिमा मलीन करण्याचे काम होत असते त्यामुळे चाहते आणि हितचिंतक यांनी काळजी करू नये.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत