देवळाली प्रवरात आज गुरुवारी सायंकाळी नियोजन बैठक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात आज गुरुवारी सायंकाळी नियोजन बैठक

  देवळाली प्रवरा(वेबटीम) सराला बेट येथील सदगुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या १२० व्या पुण्यतिथीनिमित्त व मंदिर जिर्णोध्दार पूर्वक विविध द...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



सराला बेट येथील सदगुरू योगीराज गंगागिरी महाराज यांच्या १२० व्या पुण्यतिथीनिमित्त व मंदिर जिर्णोध्दार पूर्वक विविध देवता प्राणप्रतिष्ठा तसेच श्री हरिहर महायज्ञाचे निमंत्रण व नियोजन बैठका सराला बेट संस्थानचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत आज  गुरुवार दि. १३ सप्टेंबर रोजी राहुरी तालुक्यात होत असून सायंकाळी ६ वाजता देवळाली प्रवरा येथील शांताबाई कदम सांस्कृतिक भवन येथे महंत रामगिरी महाराज भविकांशी संवाद साधणार असल्याची माहिती राहुरी तालुका सद्गुरू श्री गंगागिरी महाराज भक्त परिवार यांच्यावतीने दिली आहे.



राहुरी तालुक्यात आज गुरुवार दि. १३ सप्टेंबर रोजी राहुरी, राहुरी स्टेशन (तांदुळवाडी) , आरडगाव , केंदळ , मानोरी , वळण , कोंढवड,, शिलेगाव  येथे दिवसभर महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.  देवळाली प्रवरा  येथील शांताबाई कदम सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी  ६.३० वाजता श्री क्षेत्र सरला बेट संस्थाचे महंत रामगिरी महाराज उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. तरी तालुक्यातील भाविक भक्तांनी या बैठकीस उपस्थित राहावे. असे आवाहन राहुरी तालुका सदगुरु श्री गंगागिरी महाराज भक्त परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत