देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी अजित निकत यांचा विभागीय स्तर कार्यशाळेत गौरव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी अजित निकत यांचा विभागीय स्तर कार्यशाळेत गौरव

देवळाली प्रवरा(वेबटीम) संभाजीनगर( औरंगाबाद) येथे संत एकनाथ रंगमंदिर येथे  नाशिक आणि औरंगाबाद यांची नगरपरिषद स्तरावरील  विभागीय कार्यशाळा संप...

देवळाली प्रवरा(वेबटीम)

संभाजीनगर( औरंगाबाद) येथे संत एकनाथ रंगमंदिर येथे  नाशिक आणि औरंगाबाद यांची नगरपरिषद स्तरावरील  विभागीय कार्यशाळा संपन्न झाली. 


यामध्ये देवळाली प्रवरा न.पा.चे मुख्याधिकारी श्री. अजित निकत यांनी  नगरपरिषद तर्फे घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सर्वांसमोर सादर केली. हरित प्रमाणीकरण यासारख्या विषयांवर मुख्याधिकारी निकत यांनी  सादरीकरण केले.




देवळाली प्रवरा नगरपरिषदेला 'क' वर्ग नगरपरिषदेत केंद्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत नाशिक विभागात प्रथम क्रमांक आल्याबद्दल स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी विभागाचे उपायुक्त रामविलास झंवर, नाशिकचे उपायुक्त श्री.दुसाने, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री.खांडकेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत