आंबी(वेबटीम) स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले गड किल्ले महाराजांच्या संघर्षाची आणि पराक्रमाची प्रतीके आहेत. त्या...
आंबी(वेबटीम)
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले गड किल्ले महाराजांच्या संघर्षाची आणि पराक्रमाची प्रतीके आहेत. त्यातील बरेचसे गडकोट हे कालांतराने नामशेष होत चाललेले आहेत. हा आपला इतिहास नवीन पिढी हळूहळू विसरत चालले आहेत. त्याकाळचे गडकोट किल्ले कसे असतील याची फक्त कल्पनाच करू शकतो. गडकोटांच्या स्मृती जपाव्यात यासाठीच किल्ले बनवणाऱ्या परंपरेचा उदय झालेला असावा. दिवाळीच्या सुट्टीत हे किल्ले बांधणीची प्रथा नवीन पिढीला प्रोत्साहित करावयास पाहिजे. या परंपरेतून त्यांचे गडकोटाविषयीचे प्रेम आणि दुर्ग भ्रमंतीची आवड जपली जाते. याच कल्पनेतून सह्याद्री ट्रेकर्स परिवारातर्फे दुसऱ्या वर्षी किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सह्याद्री ट्रेकर्सच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेचे नियम
किल्ले आपापल्या घरीच बनवायचे आहेत.
स्पर्धा श्रीरामपूर तालुक्यातील १६ वर्ष वयोगट पर्यंतच्या मुला - मुलींसाठी आहे.
किल्ल्यांसाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरावे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि. २३ ते २९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत नोंदणी करावी.
किल्ल्यांचे परीक्षण प्रत्यक्ष घरी घेऊन करण्यात येईल.
किल्ल्यांचा फोटो काढताना स्पर्धक शेजारी उभा राहिलेला असावा आणि तो फोटो सोबत दिलेल्या नंबरवर पाठवावा.
किल्ल्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून प्रथम तीन क्रमांकांना बक्षीस दिले जातील.
इतर स्पर्धकांना उत्तेजनार्थ योग्य ते बक्षीस देण्यात येईल.
प्रथम बक्षीस रु.५००१/-
द्वितीय बक्षीस रु.३००१/-
तृतीय बक्षीस रु.२००१/-
सहभागी सर्व स्पर्धकांना सार्थक बहुद्देशीय संस्था यांच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येईल.
किल्ले बनवलेले फोटो खालील व्हॉट्सअप क्रमांकवर पाठवावे.
उमेश शिंदे - ९७६४७६८३००
सचिन भांड - ९५९५९६६९९०
सचिन चंदन - ९४०४०१६४४३







कोणत्याही टिप्पण्या नाहीत