राहुरी(वेबटीम) तुमच्या मुलाने आमची मुलगी का पळून नेली. असे म्हणत नऊ ते दहा जणांनी दोघा बाप लेकांना लाथा बुक्क्याने व काठीने मारहाण केल्याच...
राहुरी(वेबटीम)
तुमच्या मुलाने आमची मुलगी का पळून नेली. असे म्हणत नऊ ते दहा जणांनी दोघा बाप लेकांना लाथा बुक्क्याने व काठीने मारहाण केल्याची घटना दिनांक २५ ऑक्टोबर रोजी राहुरी तालुक्यातील वांजुळपोई येथे घडली आहे. या घटनेत दोघे बापलेक जखमी झाले आहेत.
रमेश पांडुरंग नागरे, वय ४२ वर्षे, राहणार वांजुळपोई, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास रमेश नागरे हे शेतातून आणलेला कापूस गोळा करून त्यांच्या घरासमोर ठेवत होते. त्यावेळी या घटनेतील नऊ ते दहा आरोपी तेथे आले आणि रमेश नागरे यांना म्हणाले की, तुमच्या मुलाने आमची मुलगी का पळवून नेली. असे म्हणून आरोपींनी रमेश नागरे व इतर लोकांना शिवीगाळ करून लाथा बूक्क्याने व लाकडी काठीने मारहाण केली. यावेळी तुमचा मुलगा वाचला पण यापुढे तुमच्या सगळ्या मुलांचा बेत पाहिल्या शिवाय राहणार नाही. अशी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतर रमेश पांडुरंग नागरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून तिळापुर येथील जाधव नामक व्यक्तीसह इतर सहा ते सात अनोळखी इसम अशा नऊ ते दहा जणांवर गुन्हा रजी. नं. १०१९/२०२२ भादंवि कलम ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेत रमेश पांडुरंग नागरे व पांडुरंग कारभारी नागरे हे दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित राठोड हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत