राहुरी(प्रतिनिधी):- राहुरी येथील गोपाळ अग्रवाल यांच्या शेतातून चार भामट्यांनी ३५ हजार रुपये किमतीचे सुमारे दहा क्विंटल सोयाबीन पीक चोरून न...
राहुरी(प्रतिनिधी):-
राहुरी येथील गोपाळ अग्रवाल यांच्या शेतातून चार भामट्यांनी ३५ हजार रुपये किमतीचे सुमारे दहा क्विंटल सोयाबीन पीक चोरून नेल्याची घटना दिनांक २२ ऑक्टोबर रोजी राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे घडली आहे.
गोपाळ शांतीलाल अग्रवाल, वय ६९ वर्षे, राहणार शिवाजी चौक, राहुरी. यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गोपाळ अग्रवाल यांची राहुरी तालुक्यातील ताहाराबाद परिसरात शेतजमीन आहे.
त्या ठिकाणाहून दिनांक २२ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान आरोपी अक्षय लव्हाटे व इतर तीन अनोळखी इसम अशा चार जणांनी ३५ हजार रुपये किमतीचे सुमारे दहा क्विंटल सोयाबीन लबाडीच्या इराद्याने चोरून नेले आहे. चोरीची घटना लक्षात आल्यानंतर गोपाळ शांतीलाल अग्रवाल यांनी राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दाखल केली.
त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय अशोक लव्हाटे, राहणार चिंचपूर, ता. संगमनेर व इतर तीन अनोळखी इसम अशा चार जणांवर गुन्हा रजी नंबर १०२२/२०२२ भादंवि कलम ३७९, ३४ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामनाथ सानप हे करीत आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत