राहुरी(वेबटीम):- आमच्या गाडीला डॅश का मारला असे म्हणत माल वाहतूक टेम्पो चालकाला पाच जणांनी मिळून लाथा बुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण क...
राहुरी(वेबटीम):-
आमच्या गाडीला डॅश का मारला असे म्हणत माल वाहतूक टेम्पो चालकाला पाच जणांनी मिळून लाथा बुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील नगर मनमाड राज्य महामार्गावर वांबोरी फाटा येथे दिनांक २६ ऑक्टोबर रोजी रात्री घडली.
नितीन रावसाहेब कराळे, वय २६ वर्षे, राहणार मल्हारवाडी रोड, राहुरी. याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २६ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान नितीन कराळे हा त्याच्याकडील टेम्पो घेऊन नगर मनमाड राज्य महामार्गाने राहुरी कडे येत होता. तेव्हा वांबोरी फाटा येथे त्याला चार चाकी वाहनातील पाच आरोपींनी थांबवले आणि त्याला म्हणाले की, तू आमच्या गाडीला डॅश का मारला. असे म्हणून आरोपींनी नितीन कराळे याला लाथा बुक्क्यांनी तसेच लोखंडी पाईपने मारहाण केली. तसेच तू आमच्या गाडीची नुकसान भरपाई म्हणून वीस हजार रुपये आत्ताच्या आत्ता दे नाहीतर तुला जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली.
घटनेनंतर नितीन रावसाहेब कराळे याने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पाच अनोळखी लोकांवर मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुशांत दिवटे हे करीत आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत