कार चालकाला दमदाटी करून धमकी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कार चालकाला दमदाटी करून धमकी

  राहुरी (प्रतिनिधी):- माल वाहतूक टेम्पो चुकीच्या साईटने चालवून चार चाकी वाहनाला जोराची धडक दिली. चार चाकी वाहन चालकाने नुकसान भरपाई मागितली...

 राहुरी (प्रतिनिधी):-



माल वाहतूक टेम्पो चुकीच्या साईटने चालवून चार चाकी वाहनाला जोराची धडक दिली. चार चाकी वाहन चालकाने नुकसान भरपाई मागितली असता त्याला दमदाटी करून धमकी देण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील नगर मनमाड राज्य महामार्गावर तांबे पेट्रोल पंप येथे दिनांक २६ ऑक्टोबर रोजी घडली.


  रुपेश राजेंद्र पगारे, वय २७ वर्षे, राहणार विळद, ता. नगर. याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २६ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान रुपेश पगारे हा त्याचे गाडी मालक अभिजीत औटी यांच्यासह नेक्सा कार नंबर एम. एच. १२ एस. यु. १६३१ मधून नगर मनमाड रोडवरील तांबे पेट्रोल पंपा समोरून राहुरी येथून जात होते. तेव्हा आरोपीने त्याच्या ताब्यातील मालवाहू टेम्पो हा चुकीच्या साईटने भरधाव वेगात चालवून रुपेश पगारे यांच्या चार चाकी वाहनाला समोरून जोराची धडक दिली. 



गाडीचे नुकसान करून तो न थांबताच निघून गेला. त्यावेळी रुपेश पगारे याने गाडी फिरवून वांबोरी फाटा राहुरी येथे आरोपीस थांबविले. आणि त्याला म्हणाला की, तुझ्या चुकीमुळे आमच्या गाडीचे नुकसान झाले. ते भरून दे. तेव्हा आरोपीने रुपेश पगारे याला व त्याचे मालक अभिजीत औटी यांना अरेरावीची भाषा वापरून तुम्हाला काय करायचे, ते करा. तुम्ही येथून नाही गेला तर मी माझे नातेवाईक बोलावून तुमचा बेतच पाहतो, अशी धमकी दिली.


        घटनेनंतर रुपेश राजेंद्र पगारे याने राहुरी पोलीस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून मालवाहू टेम्पो नंबर एम. एच. १७ बी. वाय. ७०९२ वरील चालकावर गुन्हा रजी. नं. १०२२/२०२२ भादंवि कलम २७९, ४२७, ५०६ मोटार वाहन कायदा कलम १८४, १७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

केली.


         या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सी. एन. बऱ्हाटे हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत