आंबी(वेबटीम) सध्या सर्वत्र निसर्गाची अवकृपा दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जातो की काय अशी परिस्थ...
आंबी(वेबटीम)
सध्या सर्वत्र निसर्गाची अवकृपा दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांना तारक ठरत असून संकटकाळी तो तरणोपाय ठरत असल्याचे मत देवगड संस्थानचे महंत प्रकाशनंदगिरी यांनी व्यक्त केले. ते आंबी-अंमळनेर येथील साईराम दूध संकलन केंद्रामार्फत आयोजित केलेल्या ठेव रिबेट वाटप व दुध उत्पादक शेतकरी सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलत होते. केशव गोविंद बन येथे आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अंमळनेरचे कामगार पोलीस पाटील सुरेशराव जाधव हे होते.
शेतीबरोबरच प्रत्येकाने जोडधंदा म्हणून पशुपालन केले पाहिजे. प्रत्येकाच्या दारात एकतरी देशी गाय असावी. मृत्यूलोकामध्ये गाईला सर्वसहा असे म्हंटले जाते. सर्व सहन करण्याची ताकत एकट्या गाईमध्ये असल्याने हिंदू धर्मात गाईला पवित्र मानले जात आहे. आंबी-अंमळनेर परिसरात प्रशांत गागरे, अशोक जाधव, रोहन जाधव यांनी सुरू केलेला दुग्ध व्यवसाय आणि त्यामार्फत पशुपालकांची ते करत असलेली सेवा हे काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार महंत प्रकाशनंदगिरी महाराज यांनी व्यक्त केले.
यावेळी विचारमंचावर मोठेबाबा दूधचे अनिल राऊत, एम. बी. जगताप, एच. डी. एफ. सी बँकेचे डॉ. झरेकर,अनिल टाकसाळ, जयराम खपके, डॉ. रविंद्र महाडिक, दिपक जगधने, सुहास पोटभरे, संतोष महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी महंत प्रकाशनंदगिरी महाराज यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कृषिमित्र रायभान चाचा जाधव यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईराम दूधच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत