देवळाली प्रवरातील श्रीराम दुध संकलन केंद्राच्यावतीने दूध उत्पादकांना अनामत ठेव व रिबीट वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील श्रीराम दुध संकलन केंद्राच्यावतीने दूध उत्पादकांना अनामत ठेव व रिबीट वाटप

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील  श्रीराम दूध संकलन केंद्राच्यावतीने दिवाळी सणानिमित्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील  श्रीराम दूध संकलन केंद्राच्यावतीने दिवाळी सणानिमित्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनामत ठेव व लाभांश वाटप  करण्यात आले.



 देवळाली येथील श्रीराम दूध संकलन केंद्राच्यावतीने नेहमी शेतकरी हिताचा निर्णय घेतला जातो. या संकलन केंद्रात जवळपास ११०० ते १२०० लिटर दुध दररोज संकलित केले जाते. दर शनिवारी शेतकऱ्यांना पेमेंट दिले जाते. ही २० वर्षापासूनची परंपरा आजतागायत कायम आहे.






दुध उत्पादक सभासदांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने श्रीराम दूध संकलन केंद्राच्यावतीने अनामत ठेव १ रुपया व लाभांश १ रुपया याप्रमाणे २ रुपये प्रतिलिटरप्रमाणे वाटप संस्थेचे संस्थापक चेअरमन दत्तात्रय कदम, चेअरमन विलास लक्ष्मण वाळूंज, उत्पादक युनियन अध्यक्ष सचिन बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते करण्यात आले.





यावेळी सुनिल उंडे, गणेश कदम, अतुल लगे, शंकर कदम, राजेंद्र मुसमाडे, विजय पठारे, राहुल दुधाडे आदींसह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत