पारनेर(प्रतिनिधी) अतिवृष्टीने नूकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे जलद गतीने होण्यासाठी ई पीक पाहाणी पंचनाम्याची अट काही दिवसांपूरती शिथील क...
पारनेर(प्रतिनिधी)
अतिवृष्टीने नूकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे जलद गतीने होण्यासाठी ई पीक पाहाणी पंचनाम्याची अट काही दिवसांपूरती शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहीती महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मंत्री विखे पाटील यांनी आज तिसर्या दिवशी शेवगाव आणि पारनेर तालुक्यातील नूकसानग्रस्त भागाची पाहाणी करून ठिक ठिकाणी शेतकर्यांशी संवाद साधला.थेट बांधावर जावून त्यांनी सर्व वरीष्ठ अधिकार्या समवेत त्यांनी बाधीत झालेल्या शेती पिकांची पाहाणी करून पंनाम्याचा आढावा घेतला.
शेतकऱ्यांकडून पंचनाम्या संदर्भात येत असलेल्या तक्रारीची दखल घेवून मंत्री विखे पाटील यांनी ई पीक पाहाणी पंचनाम्याची अट काही दिवसां करीता शिथील करण्यात येत असल्याचा निर्णय जाहीर केला.अनेक ठिकाणी रेंज मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.शेतकऱ्यांकडे अॅन्डाॅईड मोबाईल नाहीत.आशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पंचनामे होतील की नाही आशी भीती असून या संकटात पंचनाम्याच्या बाबतीत कोणतीही त्रृटी राहू नयेत म्हणून .सरसकट पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले असून काही दिवसां करीता ई पीक पाहाणीची अट शिथील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून,एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहाणार नाही याची काळजी सरकार निश्चितपणे घेईल आशी ग्वाही देतानाच यापूर्वी झालेल्या नैसर्गिक संकटातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत देवून दिलासा आहे.मदतीचा निर्णय करताना दोन हेक्टरची अट शिथील करून तीन हेक्टरपर्यत त्याची मर्यादा वाढवली असल्याकडे लक्ष वेधून मदतीच्या रकमेतही पहील्यांदाच वाढ करण्यात आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
मंत्री विखे पाटील यांनी आळकुटी निघोज जवळा गांजीभोयरे या गावातील नूकसान झालेल्या पिकांची पाहाणी करून त्यांच्या मागण्याची निवेदन स्विकारली.सुजित झावरे भाजपाचे तालुका अध्यक्ष वसंतराव चेडे प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे डॉ भास्करराव शिरोळे राहूल शिंदे सचिन वराळ शिवाजीराव सालके बाळासाहेब पठारे
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले प्रांताधिकारी सुधाकर भोसले
तहसिलदार शिवकुमार अवलकंठी पशुसंवर्धन उपायुक्त डॉ तुंभारे यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत