देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा मुसमाडे कुटूंबियांतील कन्येंनी ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना फराळ देऊन दिवाळी साजरी...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा मुसमाडे कुटूंबियांतील कन्येंनी ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना फराळ देऊन दिवाळी साजरी केली.
दिवाळी सणाच्या पूर्वीच अनेक सुरू होत असल्याने ऊस तोडणी कामगार ऊस तोडण्यासाठी शेतात दाखल होतात.
देवळाली प्रवरा येथील मुसमाडे वस्ती येथे संजीवनी कारखान्याचे ऊस तोडणी कामगार दाखल झाले आहे.
त्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने देवळाली प्रवरा येथील तरुण उद्योजक प्रशांत मुसमाडे यांची कन्या राजवी व विशाल मुसमाडे यांची कन्या राजलक्ष्मी यांनी ऊस तोड कामगारांच्या पालावर जाऊन फराळ वाटप केले व छोट्या मुलांना सोबत दिवाळी साजरी केली.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत