राहुरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील साईसेवा नागरी सहकारी पतसंस्थेची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.३०/०९/२०२२ रोजी आयोजित करण्...
राहुरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील साईसेवा नागरी सहकारी पतसंस्थेची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.३०/०९/२०२२ रोजी आयोजित करण्यात आली होती.
संस्थेचे मा. संस्थापक चेअरमन श्री. प्रदीप येवले यांच्या अध्यक्षतेखाली विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा होऊन सर्व विषयांवर खेळीमळीत निर्णय घेण्यात येऊन सर्व ठराव संमत करण्यात आले. आपले मनोगत व्यक्त करताना मा. संस्थापक चेअरमन श्री. प्रदीप येवले यांनी पतसंस्थेचा कारभार हा लोकाभिमुख व पारदर्शी करून कर्जदारांना व ठेवीदारांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे अभिवचन दिले, तसेच मा. व्हा. चेअरमन प्रा. विलास मुसमाडे सर यांनी लहान उद्योजक व अडचणीत असणारा लहान - सहान व्यावसायिक वर्ग यांना मदतीचा हात देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यावर संस्थेचा भर असेल, तसेच सभासदांच्या व ठेवीदारांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता संस्थेचा कारभार पारदर्शक करू असे अभिवचन दिले.
पतसंस्थेचे जनरल मॅनेजर श्री. अशोक कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले प्रथम वार्षिक सभेसाठी पतसंस्थेचे सर्व संचालक श्री. शिवाजीराव बंगाळ, श्री. दत्तात्रय गाडे, श्री. ज्ञानदेव वरखडे, श्री. लक्ष्मण क्षीरसागर, श्री. मनोहर ढुस, श्री. बाळासाहेब तुपे, श्री. सतीश वाघ, श्री. सोमनाथ सरोदे, तसेच महिला संचालिका सौ. दिपाली शिंदे, सौ. विजया मुसमाडे, उपस्थित होते. तसेच पतसंस्थेचे इतर सभासद व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक मा. व्हा. चेअरमन श्री. विलास मुसमाडे सर यांनी केले तर आभार डॉ. ज्ञानदेव वरखडे यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत