गणेगाव(प्रविण कोबरणे) राहूरी तालुक्यातील गणेगाव येथे तुळजाभवानी माता नवरात्र उत्सव मंडळ व समस्थ ग्रामस्थ गणेगाव यांच्यावतीने नवरात्र उत्सवनि...
गणेगाव(प्रविण कोबरणे)
राहूरी तालुक्यातील गणेगाव येथे तुळजाभवानी माता नवरात्र उत्सव मंडळ व समस्थ ग्रामस्थ गणेगाव यांच्यावतीने नवरात्र उत्सवनिमित आयोजित देविभागवत कथेस भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
तुळजाभवानी मंदिरात नवरात्र उत्सवनिमित ह.भ.प अमृतानंद महाराज कांकरिया यांची देवी भागवत कथा सुरू असून दररोज विविध विषयाला अनुसरून मार्गदर्शन केले जात आहे.
गणेगाव मधील सर्व तरुण वर्ग यात हिरीरीने सहभागी होत आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदर्श गावचे सरपंच अमोल भनगडे, श कारभारी कोबरणे, विलास कोबरणे ,भारत कोबरणे, उपसरपंच विकास कोबरणे, संदीप कोबरणे,केशव खाडे तसेच सर्व सदस्य ग्रामस्थ व भक्त मेहनत घेत आहे.
आज मंगळवारी सायंकाळी या कथेत नवदुर्गा पूजन व फलश्रुती संपन्न होणार आहे. तर उद्या विजयादशमीच्या दिवशी सकाळी ९ ते ११ यावेळेत ह.भ.प अमोल महाराज बडाख(मालुंजेकर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसाद वाटपाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत