राहुरी फॅक्टरी फातिमा माता चर्च येथे यात्रा उत्सवास प्रारंभ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी फातिमा माता चर्च येथे यात्रा उत्सवास प्रारंभ

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम)     राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गा लगत असलेल्या फातिमा माता चर्च येथे फातिमा मातेचा यात्रा उत्सव शनिवार २९ ऑ...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)




    राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड मार्गा लगत असलेल्या फातिमा माता चर्च येथे फातिमा मातेचा यात्रा उत्सव शनिवार २९ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे. दोन ते तीन दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्त रहाट पाळणे, खेळणी व खाऊची दुकाने थाटली आहेत.यात्रेसाठी सर्व धर्मीय नागरिक हजेरी लावत आहे.



राहुरी फॅक्टरी धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख याजक फा.मायकल राजा,फा.सतीश कदम,फा.संपत भोसले,फा.मॅथ्यू परनानिकल,फा.नेव्हल फर्नांडिस,फा.फिलीप,फा.जेम्स,फा.सॅंटो,फा.मायकल वाघमारे,फा.राजेंद्र लोंढे,फादर मुक्ती तसेच सिस्टर प्रेमा,सि.मेरी जोसेफ,सि.फातिमा,सि.कविता,सि.अल्फोंसा,सि.सिसिलिया, सि.अर्चना,येशू मरीया सदनच्या सिस्टर सुपीरिअर सि.शैला,सि.स्मिता,सि.जुड, सि.कॉन्स्टंट,सि.स्टिबा आदी धर्मगुरू व धर्म भगिनींच्या प्रमुख उपस्थितीत यात्रा उत्सवास प्रारंभ झाला.





यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पडावा यासाठी संजय संसारे, इग्नाती केदारी सर,वसंत सांगळे,फकीरा कदम,भिकाजी ओहोळ गुरुजी,विवेक भोसले,बाळासाहेब बागुल,बाळासाहेब शिंदे,सागर पाळंदे,शरद साळवे,प्रताप पाळंदे,प्रमोद संजय मगर सर,प्रतिक कसबे,राजू कांबळे सर,पत्रकार आशिष संसारे,नेल्सन कदम, मयुर कदम, विकी पंडित, आशु सांगळे, जेम्स पाळंदे, दीपक सांगळे, किरण पंडित,  तसेच फातिमा माता युवा मंच व भिमतेज मित्र मंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत