राहुरी फॅक्टरी(वेबटीम) गेट-टुगेदर साजरा केल्याने जुन्या आठवणीना उजाळा मिळतो तसेच त्यामधुन पुढील पिढीला प्रोत्साहान मिळते असे गौरवोउद्गार ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
गेट-टुगेदर साजरा केल्याने जुन्या आठवणीना उजाळा मिळतो तसेच त्यामधुन पुढील पिढीला प्रोत्साहान मिळते असे गौरवोउद्गार माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम यांनी काढले.
देवळाली प्रवरा येथील श्री. छत्रपती शिवाजी माध्यामिक व उच्च माध्यामिक विदयालयातील सन.१९७९ चे इ. १० वीच्या विदयार्थ्यांच्या गेट टुगेदर प्रसंगी ते बोलत होते. यावेळेस देवळाली प्रवस नगरपरिषदेचे मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. सत्यजित कदम उपस्थित होते.
देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यामिक व उच्च माध्यामिक विद्यालयातील सन १९७९ चे इ.१० वीचे वर्गमित्र दिवाळी भाऊबीजेच्यदिवशी हा कार्यक्रम आयोजित करत असतात. यावर्षी नानासाहेब पुंजाजी कदम यांच्या वस्तीवर हा गेट टू गेदर कार्यक्रम पार पडला. गेल्या ४३ वर्षाच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमा करिता वर्गमित्र तसेच देवळाली प्रवराचे भुमीपुत्र व पुणे येथील प्रसिध्द उदयोजक, राजपथ इन्फाचे तथा दौंड शुगर कारखान्याचे चेअरमन जगदीश कदम उपस्थित होते. यावर्षी देखील त्यांनी उपस्थीत राहून सर्व मित्रा सोबत चर्चा करुन सर्वांचा आनंद द्विगुणित केला.
या प्रसंगी उद्योजक जगदिश कदम म्हणाले ,आम्ही सर्व मित्र ही शेतकऱ्यांची मुले आहोत. आम्ही सर्वजण कुठल्या न कुठल्या क्षेत्रामध्ये नांव लौकीक करत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले की, तुम्ही सर्वजण खरोखर भाग्यशाली आहात. गेली १५ ते १६ वर्षापासून तुम्ही सर्व वर्ग मित्र दरवर्षी एकत्र येवून हा कार्यक्रम साजरा करतात. त्यांचा खरोखर सर्वांनी आदर्श घ्यावा व येथून पुढे देखील तुम्ही सर्वांनी असाच कार्यक्रम सुरु ठेवावा.
सन २००५ पासून आजतागायत गेट टू गेदर दरवर्षी भरविले जाते. उद्योजक जगदीश कदम नेहमी आम्हा मित्रांना प्रेरणा देत असतात त्यामुळे आम्ही एकत्र येतो. सर्व वर्गमित्रांना जगदिश कदम यांनी स्वखर्चाने नोव्हेंबर २०१९ मध्ये परदेश वारी ( दुबई ) येथे घडून आणली होती.त्यांच्या मित्राबद्दल असलेला जिव्हाळा खूप मोठा असल्याचे मुकुंद ढुस म्हणाले. सूत्रसंचालन मुकुंद ढुस यांनी केले तर आभार श्री. पी.बी.कदम यांनी मानले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत