राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील एका कंपनीमधून १ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी गेल्याची घटना दिनांक २ ऑक्टोबर रोजी...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील एका कंपनीमधून १ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी गेल्याची घटना दिनांक २ ऑक्टोबर रोजी घडली. याबाबत काल राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुदस्सीर अलीखान पठाण, वय ५५ वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार मल्हारवाडी रोड, राहुरी बुद्रुक, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक २ ऑक्टोबर रोजी चे पूर्वी राहुरी तालुक्यातील वांबोरी रेल्वे स्टेशन शेजारी धामोरी शिवारातील कंपनीमधून
आरोपी सचिन कदम याने ९५ हजार रुपये किमतीचे वायर, व्हील बोल्ट, वेल्डिंग इलेक्ट्रोड, व्ही राॅड, बुश तसेच ६० हजार रुपये किमतीचे टायर, ४० हजार रुपये किमतीचे भंगार असा एकूण १ लाख ९५ हजार रुपये किमतीचा कंपनीचा मुद्देमाल त्याचे कब्जात असताना त्याने वेळोवेळी चोरून त्याची परस्पर विल्हेवाट लावली व स्वतःच्या फायद्या करिता व लबाडीच्या इराद्याने त्याचा अपहर केला.
मुदस्सीर अलीखान पठाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन दशरथ कदम, राहणार दत्तात्रय सेवा मंडळ, शिवकृपा चाळ, सुमन नगर, चेंबूर, मुंबई. याच्यावर गुन्हा रजी. नं. १००९/२०२२ भादंवि कलम ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वाल्मीक पारधी हे करीत आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत