राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील मुळा नगर येथील मत्स्य शेती प्रकल्पामधून सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची घटना १० ऑक्टोबर ते...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील मुळा नगर येथील मत्स्य शेती प्रकल्पामधून सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची घटना १० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान घडली असून याबाबत आज राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतीश भाऊसाहेब फुलसौंदर, वय ४० वर्षे, राहणार तनपुरेवाडी रोड, राहुरी बुद्रुक, तालुका राहुरी. यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
दिनांक १० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान राहुरी तालुक्यातील मुळानगर गावचे शिवारात नीलक्रांती योजनेअंतर्गत धरणामध्ये असलेल्या केज प्रकल्पावर अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघड झाली.
या चोरीमध्ये सुमारे २ लाख रुपये किमतीचे इन्व्हर्टर, बॅटऱ्या, कॅमेरे, डिव्हीआर, स्क्रीन, बोट मशीन अशा प्रकारचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.
सतीश भाऊसाहेब फुलसौंदर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजी. नं. ९९१/२०२२ भादंवि कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सानप हे करीत आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत