राहुरी(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील देसवंडी गावचे सुपुत्र व डॉ.तनपुरे कारखान्याचे सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी अण्णासाहेब पवार यांचे सुपुत्र...
राहुरी(वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील देसवंडी गावचे सुपुत्र व डॉ.तनपुरे कारखान्याचे सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी अण्णासाहेब पवार यांचे सुपुत्र अमोल पवार यांची सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती झाल्याबद्दल राहुरी फॅक्टरी येथील मित्र परिवाराच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
अमोल अण्णासाहेब पवार यांची सन २००७ मधे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त जलसंपदा विभागामधे सहाय्यक अभियंता श्रेणी २ या पदावर नेमणूक झाली. त्यानंतर पुन्हा २०१० मधे झालेल्या परीक्षेमधे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागामधे सहाय्यक अभियंता श्रे. १ च्या पदावर नियुक्ती मिळाली.
या पदावर १२ वर्ष सेवा केली. त्यांची नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता या पदावर पदोन्नती झाली.
याबद्दल राहुरी फॅक्टरी येथील मित्र परिवार व विविध सामाजिक संघटनेच्यावतीने अमोल पवार यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा सचिव अजय खिलारी, राजेंद्र बोरुडे, बाळासाहेब लोखंडे, बाळासाहेब आढाव, दीपक ढुस, सचिन निमसे, गजानन घुगरकर, शशीकांत खाडे, संदीप मुसमाडे,कृषी सहाय्यक राजेंद्र ढुमणे,अतुल सगळगीळे,संदीप महाडिक आदिंसह मित्र परिवार उपस्थित होते.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत