देवळालीकरांच्या आशीर्वादाने व सहकाऱ्यांच्या परिश्रमामुळे 'राजपथ'च्या कार्याची गिनिज बुक मध्ये नोंद - जगदीश कदम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळालीकरांच्या आशीर्वादाने व सहकाऱ्यांच्या परिश्रमामुळे 'राजपथ'च्या कार्याची गिनिज बुक मध्ये नोंद - जगदीश कदम

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- देवळाली प्रवराच्या मातीत संस्काराचे बीज रुजून माझे स्वतःचे व्यक्तिमत्व फुलत गेले. सर्व थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादामु...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-


देवळाली प्रवराच्या मातीत संस्काराचे बीज रुजून माझे स्वतःचे व्यक्तिमत्व फुलत गेले. सर्व थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादामुळेच राजपथ इन्फ्रास्ट्रक्चरच्या कार्याची गिनीज बुक मध्ये नोंद झाली.  खऱ्या अर्थाने यामागे देवळालीकरांचे व माझ्या सर्व सहकाऱ्यांचे यश असल्याचे प्रतिपादन देवळाली प्रवराचे भूमिपुत्र तथा उद्योजक जगदीश कदम यांनी केले.


राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेच्या वतीने जगदीश कदम यांच्या राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अवघ्या ५ दिवसांत अमरावती ते अकोला  ७५ किलोमीटर रस्ता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केल्याबद्दल बुधवारी सकाळी त्यांचा सन्मान करण्यात आला.



आदर्श पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब चोथे यांनी कदम यांचा सन्मान केला.व्हा.चेअरमन प्रा. सुधाकर कदम यांनी प्रास्ताविक केले.


पुढे बोलताना जगदीश कदम म्हणाले की,आझादी का अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने देशाला समर्पित असे कुठलेतरी काम व्हावे अशी मनोमन इच्छा होते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यासाठी आग्रह धरला होता. त्यानुसार आव्हान म्हणून अकोला ते अमरावती रस्त्याचे काम अवघ्या पाच दिवसांत पूर्ण केले. एवढे मोठे आव्हान पार करत असताना सहकारी कर्मचाऱ्यांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या कथा सांगून ऊर्जा निर्माण केली त्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले हे काम करत असताना परमेश्वर खांद्याला खांदा लावून सोबत असतो याची प्रचीतीही आल्याचे कदम यांनी सांगितले. आदर्श नागरी पतसंस्थेचा कारभार चांगला असून डोळ्यात तेल घालून चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ काम करताय भविष्यात त्यांची अशीच प्रगती होवो अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.



यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, शिवाजीराव कपाळे, आबासाहेब वाळुंज, हर्षद ताथेड, प्रकाश सोनी, सुभाष शेकडे, मारुती खरात, भारत काळे , प्रकाश संसारे, सचिन ढुस, अजित चव्हाण, भारत शेटे, शहाजी कदम, किशोर थोरात, वसंत कदम, रमेश ताकटे, अजित येवले, किशोर कोबरने, दिपक त्रिभुवन,अशोक काळे,बाबासाहेब खुळे, चंद्रकांत दुधाळ, रामेश्वर तोडमल, प्रशांत तोडमल, राहुल ठाणगे, शामराव खडके,मॅनेजर ज्ञानेश्वर सोनवणे,दत्तात्रय मोरे, विनोद चोथे, अनिल थोरात,आदी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.सुधाकर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला.


प्रसंगी आभार प्रकाश सोनी यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत