राकेश ओला अहमदनगरचे नवे 'एसपी' - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राकेश ओला अहमदनगरचे नवे 'एसपी'

अहमदनगर/वेबटीम:- अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली आहे सध्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्य...

अहमदनगर/वेबटीम:-

अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली आहे सध्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नियुक्ती संदर्भात स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.




गेल्या आठ ते दहा दिवसांत नगर जिल्ह्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त होत होती. 




दरम्यान आज अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदी राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राकेश ओला नागपूर येथे अँटी करप्शन विभागाचे एसपी म्हणून कार्यरत होते.


 दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या नियुक्ती संदर्भात स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.




२०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले राकेश ओला सरळ सेवा भरतीने सहायक पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. सप्टेंबर २०१४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली.

त्यावेळी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी टोळीने अहमदनगरसह संपूर्ण राज्यात हैदोस घातला होता. या टोळीचा त्यांनी छडा लावून टोळीचे कंबरडे मोडले होते.

वाचा राकेश ओला यांच्याविषयी

कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि हसतमुख अधिकारी म्हणून राकेश ओला यांची प्रतिमा आहे. २०१२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले ओला सरळ सेवा भरतीने सहायक पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले होते. सप्टेंबर २०१४ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूरला त्यांना सर्वात पहिली नियुक्ती मिळाली. त्यावेळी तोतया पोलीस बनून लोकांना लुटणाऱ्या इराणी टोळीने अहमदनगरसह संपूर्ण राज्यात हैदोस घातला होता. या टोळीचा त्यांनी छडा लावून टोळीचे कंबरडे मोडले, मे १६ मध्ये त्यांची तेथून मालेगावला अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली. जातीय दंगलीची पार्श्वभूमी असलेल्या मालेगावात त्यांनी मे २०१७ पर्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली. तेथून ते जून २०१७ ला नागपुरात पोलीस उपायुक्त म्हणून बदलून आले. येथे त्यांना परिमंडळ दोनची जबाबदारी देण्यात आली. नागपूर, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये तोतया पोलीस बनून लुटणाऱ्या टोळीचा तसेच कारची काच फोडून रोकड आणि मौल्यवान चिजवस्तूंची बॅग लंपास करणाऱ्या टोळीचा त्यांनी छडा लावला.याशिवाय अनेक गंभीर गुन्ह्यांचाही छडा लावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमीका वठविली. कोणत्याही स्थितीत शांतपणे आणि हसतमुख काम करण्याची त्यांची शैली त्यांना ‘कुल आफिसर’ म्हणून ओळख देऊन गेली आहे.


 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत