आभाळ फाटलं!राहुरी तालुक्यात पावसाचा कहर! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आभाळ फाटलं!राहुरी तालुक्यात पावसाचा कहर!

राहुरी (वेबटीम) गुरुवारी भल्या पहाटे राहुरी तालुक्यात बरसलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील बळीराजाची पुरती वाट लावली,गेले अनेक दिवस सुरु अस...

राहुरी (वेबटीम)



गुरुवारी भल्या पहाटे राहुरी तालुक्यात बरसलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील बळीराजाची पुरती वाट लावली,गेले अनेक दिवस सुरु असलेल्या पावसापासून वाचवालेल्या शेतातील पिके या पावसाने पूर्ण नेसतनाबूत झाल्याने उरलं सुरलं ही हिसकवलं गेलं आहे.



     गुरुवारी पहाटे साडे चार वाजता प्रचंड विजेच्या कडकडकटा सह पाऊस धो धो बरसला.सलग दीड तासहून अधिक वेळ बरसलेल्या पावसाने ओढे नाले तुडुंब झाले मात्र जास्तच पाऊस झाल्याने अनेक ठिकाणचे अडवलेले बांध फुटून पाणी वाहते झाले आणी सर्वत्र हाहाकार उडाला,श्रीरामपूर -देवळाली या रस्त्या सह तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने वाहतुकीसाठी बंद झाले, काही ठिकाणी झाडें उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाले.




  राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख,वरिष्ठ पोनि प्रताप दराडे, देवळाली प्रवराचे मुख्याधिकारी अजित निकत, तलाठी दीपक साळवे  या अधिकाऱ्यांनी स्वतः सर्वत्र फिरून आपल्या टीम मार्फत शेतकऱ्यांना आधार दिला.कुठेही जीवीत हानी होणार नाही याची काळजी घेतली.ठीक ठिकाणी तुंबलेले पाण्याला यंत्राच्या सह्याने वाट मोकली करून दिली.बळीराजाला दिलासा ,मदत देण्यासाठी नायब तहसीलदार, सर्कल, तलाठी पासून कोतवाल पर्यंत तर पोलीस उप निरीक्षक पासून पोलीस शिपाई व देवळाली प्रवरा नगर परिषदेचे विभाग प्रमुख सह शिपयापर्यंत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात कष्ट घेऊन लोकांना दिलासा देत मदत कार्य रात्री उशिरपर्यंत सुरु ठेवले.


आमदार कानडे यांची धावती भेट!

श्रीरामपूर विधानसभेचे आमदार लहू कानडे  यांनी गुरुवारी संध्याकाळी सहा वाजनेच्या दरम्यान देवळाली प्रवरा येथे एका वस्तीला धावती भेट देऊन फोटोशूट केले.आपल्या अर्ध्या तासाच्या भेटीसाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना आपले हातातले काम सोडून धावत देवळाली गाठावी लागली. देवळाली शहराच्या गजबजलेल्या डेपो चौकात दहा मिनिटे गाडीत बसून राहिलेल्या आमदारांनी समोर उभे असणाऱ्या लोकांना खाली उतरून साधी विचारपूस करण्याचे औदर्य दाखवलं नाही. या विषयी त्या ठिकाणी जोरदार चर्चा झाली.या बाबत अनेकांना माजी आमदार भाऊसाहेब कांबळेंंची आठवण झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत