फटाके विक्रेते गाळेधारकांना गाळे भाडे माफ करा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

फटाके विक्रेते गाळेधारकांना गाळे भाडे माफ करा

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर  पावसामुळे व्यापारी, नागरिक,शेतकरी त्रस्त झाला आहे.फटका खरेदीसाठी अत्यल्प प्रतिसाद  असल्या...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर  पावसामुळे व्यापारी, नागरिक,शेतकरी त्रस्त झाला आहे.फटका खरेदीसाठी अत्यल्प प्रतिसाद  असल्याने फटाका विक्रेत्यांना मोठा फटका बसत आहे.त्यामुळे राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा परीसरातील व्यापारी असोसिएशनच्यावतीने फटाके विक्रेते गाळेधारकांचे गाळे भाडे माफ करावे अशा मागणीचे निवेदन देवळाली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांना देण्यात आले आहे.





या निवेदनात म्हटले की,दिवाळी सणाच्या कालावधीत  मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने फटाके विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. बाजारात शुकशुकाट असून फटाके पूर्णपणे विकले जाण्याची शक्यता कमी आहे.


त्यामुळे देवळाली नगरपालिकेने फटाके विक्रेत्यांचे गाळे भाडे माफ करावे अशी मागणी मुख्याधिकारी अजित निकत यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


या निवेदनावर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष विष्णुपंत गीते,उपाध्यक्ष सुनील विश्वासराव,राजेंद्र उंडे, सूर्यकांत लासुरकर, नितीन डंबाळे, योगेश मुसळे,गजानन कोहकडे, शरद वाळके, अजिंक्य गायकवाड,अमोल वाळुंज, मेहमूद शेख,समीर शेख आदींच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत