रयत शैक्षणिक संकुल सात्रळ येथील मुले विभागाचा पावसाळी क्रीडा महोत्सव संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रयत शैक्षणिक संकुल सात्रळ येथील मुले विभागाचा पावसाळी क्रीडा महोत्सव संपन्न

सात्रळ(वेबटीम) रयत शिक्षण संस्थेचे नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय व बापुजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय सात्रळ यांच्या संयुक्त विद...

सात्रळ(वेबटीम)



रयत शिक्षण संस्थेचे नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय व बापुजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय सात्रळ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष-२०२२-२३ चा पावसाळी क्रीडा महोत्सव संपन्न झाला.

         क्रीडा महोत्सवात इ.५ वी ,६ वी साठी मनोरंजन खेळांमध्ये संगीत खुर्ची, गाढवाला शेपटी लावणे,तीन पायांची शर्यत असे खेळ घेण्यात आले.आणि ७ वी, इ ८ वी साठी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या.

        त्याचप्रमाणे इ.९ वी,इ.१० साठी कब्बडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवातील प्रत्येक खेळाचा विद्यार्थ्यांनी भरपूर आनंद घेतला.

   याप्रसंगी संकुलाचे प्राचार्य किशोर ससाणे,पर्यवेक्षक सिराज मन्सुरी यांच्या शुभहस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

     या क्रीडा महोत्सवाचे नियोजन क्रीडा शिक्षक विलास गभाले, सहाय्यक क्रीडा शिक्षक पूरब सूर्यवंशी,जेष्ठ शिक्षक त्रिंबक राशिनकर यांनी नियोजन केले होते.तर पंच म्हणून पत्रकार अमोल अंत्रे, जेष्ठ शिक्षक युनूस पठाण,भारत कोहकडे, सच्चिदानंद झावरे, संजय दिघे यांनी काम बघितले.तसेच गुणलेखक म्हणून प्रकाश कुलथे व कलाशिक्षक सतिश नालकर यांनी कामकाज पार पाडले.

    या क्रीडा महोत्सवासाठी ज्येष्ठ शिक्षक-केशव मुसमाडे,वैभव वसावे, शिवदास सातपुते,देविदास थोरात, सुदर्शन गिते,सुमेश शिंदे,सुनिता ढोकणे, पल्लवी गावडे, प्रांजली फरकाडे,प्रविणाबाई दिघे, कविता वदक,गिताजंली गोसावी आदिनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत