देवळाली प्रवरातील चरात आढळून आलेला तो' मृतदेह राहूरीतील तरुणाचा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील चरात आढळून आलेला तो' मृतदेह राहूरीतील तरुणाचा

  राहुरी(वेबटीम) तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नव्याने उभारण्यात येत असलेल्या साई मंदिराच्या पाठीमागील चरात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख प...

 राहुरी(वेबटीम)



तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नव्याने उभारण्यात येत असलेल्या साई मंदिराच्या पाठीमागील चरात आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून सदर मृतदेह राहुरी शहरातील कासार गल्लीतील तरुणाचा आहे. ओळख पटल्यानंतर पोलीसांनी मृतदेह नातेवाईकांकडे अंत्यविधीसाठी दिला. त्यानंतर राहुरी शहरातील गणपती घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.



अमोल गणपत जाधव (वय-३२) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो गेल्या दोन दिवसापासून राहत्या घरातून बेपत्ता होता. देवळालीत चरात मृतदेह आढळून आल्याचे वृत्त माध्यमात येताच अमोल जाधव यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलिस ठाणे गाठले.  या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाठ हे करीत असताना त्यांनी नातेवाईकांना मृतदेह दाखविला असता त्यांच्या अंगातील शर्ट व हातात बांधलेली राखी यावरून मृतदेहाची ओळख पटली. सर्व प्रकिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांकडे अंत्यविधीसाठी देण्यात आला. 



त्यानंतर राहुरी येथील गणपती घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अमोल याच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत