सायकलवरून क्लासला जात असलेल्या शाळकरी विद्यार्थीनीचा विनयभंग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सायकलवरून क्लासला जात असलेल्या शाळकरी विद्यार्थीनीचा विनयभंग

राहुरी(वेबटीम)  सायकलवरून क्लाससाठी जात असलेल्या शाळकरी मुलीस अडवून विनयभंग करून घरी सांगितले तर वडिलांच्या डोक्यात दगड घालू अशी धमकी दिल्या...

राहुरी(वेबटीम)



 सायकलवरून क्लाससाठी जात असलेल्या शाळकरी मुलीस अडवून विनयभंग करून घरी सांगितले तर वडिलांच्या डोक्यात दगड घालू अशी धमकी दिल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात कणगर येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 कणगर परिसरातील १५ वर्षीय शाळकरी मुलगी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता सायकलवरून खासगी क्लासला जात असताना समोरुन  काळ्या रंगाचे मोटारसायकवर आलेल्या दत्तात्रय अशोक वरघुडे, गणेश विठ्ठल वरघुडे (दोन्ही रा . वरघुडे वस्ती कणगर ता . राहुरी) यांनी शाळकरी विद्यार्थीनीस हाक मारली.त्यावर फिर्यादिने थांबुन काय झाले विचारले असता अशोक वरघुडे फिर्यादीस म्हणाला की , तु गणेश वरघुडे यास आवडतेस असे म्हणाल्याने फिर्यादी घाबरुन पुन्हा सायकवर बसुन रस्त्याने जात असताना दोघांनी फिर्यादीचा पाठलाग करुन तु झाल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर तुझ्या वडीलांच्या डोक्यात दगड घालु अशी धमकी दिली.



याबाबत पीडित शाळकरी विद्यार्थीनीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात दत्तात्रय अशोक वरघुडे, गणेश विठ्ठल वरघुडे (दोन्ही रा . वरघुडे वस्ती कणगर ता . राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत