अहमदनगर (प्रतिनिधी) - शिक्षक बँकेमध्ये विद्यमान सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाने आमचे नेते बापूसाहेब तांबे व राजकुमार साळवे यांच्या नेतृत्वाखाल...
अहमदनगर (प्रतिनिधी)
- शिक्षक बँकेमध्ये विद्यमान सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाने आमचे नेते बापूसाहेब तांबे व राजकुमार साळवे यांच्या नेतृत्वाखाली सभासद हिताचंच काम केलेलं आहे आणि या चांगल्या कारभाराच्या जोरावर पुन्हा एकदा गुरुमाऊली मंडळ 2015 ची सत्ता बँकेमध्ये येणार आहे. सभासदहिताला प्राधान्य देणारं गुरुमाऊली मंडळ 2015 हे एकमेव मंडळ आहे. जिल्ह्याचा प्रचार दौरा सध्या सुरू असून सभासदाकडून मिळणारा उत्तम प्रतिसाद हा आमच्या विजयाची नांदी असून पुन्हा एकदा शिक्षक बँकेमध्ये गुरुमाऊली2015, शिक्षक भारती, ऐक्य मंडळ व एकल मंच आघाडीची सत्ता निश्चित येणार आहे असे ठाम प्रतिपादन बँकेचे विद्यमान चेअरमन किसनराव खेमनर यांनी केले.
शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात ठिक ठिकाणी सभासदांशी संपर्क साधल्यानंतर खेमनर बोलत होते. सदिच्छा आणि गुरुकुल मंडळाच्या कामकाजाचा अनुभव सभासदांना आहे. ज्यांनी त्यांच्या काळामध्ये वारेमाप उधळपट्टी केली ते आज आम्हाला नावे ठेवीत आहेत. मात्र आम्ही सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. या पंचवार्षिकमध्ये आतापर्यंत अडीच टक्के कर्जावरील व्याजदर कमी केला आहे. हे पहिल्यांदा घडले आहे. कायम ठेवीवर उच्चांकी असा सव्वा आठ टक्के पर्यंत व्याज आमच्या संचालक मंडळाने दिला आहे. लाभांश रूपाने १०.१० टक्के रक्कम देऊन खऱ्या अर्थाने सभासदांच्या अपेक्षांची पूर्ती केली आहे. त्यामुळे सभासद आमच्या कारभारावर खुश आहेत. सदिच्छा मंडळ व गुरुकुल चा कारभार सभासदांनी जवळून अनुभवला आहे.गेल्या सहा वर्षात बँकेमध्ये एकही दिवस कर्ज वितरण थांबलेले नाही. सभासदांना संचालकांना फोन करावा लागत नाही.सभासदांच्या ज्या मुख्य अपेक्षा आहेत त्या म्हणजे कर्जाचा व्याजदर कमी झाला पाहिजे, लाभांश आणि कायम ठेवीवर जास्त व्याज मिळाला पाहिजे.या अपेक्षा फक्त याच संचालक मंडळाने पूर्ण केल्या आहेत. आज जिल्ह्याचे वातावरण सर्वत्र गुरुमाऊलीमय झालेले आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते आता बेताल आणि खोटे नाटे आरोप करीत आहेत मात्र बँकेचे सर्व सभासद सुज्ञ असून ते या भूलथापांना बळी पडणार नाहीत.आगामी काळामध्ये कर्जाचा व्याजदर सात टक्के करणे आणि सभासदांना नवीन सुविधा निर्माण करणे. बँकेचा कारभार दीड टक्याचे फरकाने करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. जिल्हाभरामध्ये गुरुमाऊली मंडळाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याने 17 तारखेला आमचा विजय निश्चित आहे. सभासदांचा मिळवलेला विश्वास भविष्यातही सार्थकी लावू असेही खेमनर यांनी सांगितले. यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन सुयोग पवार, माजी चेअरमन साहेबराव अनाप, सलीमखान पठाण,संतोष दुसुंगे, शरदभाऊ सुद्रिक, राजू रहाणे, माजी व्हाईस चेअरमन विद्युलता आढाव, बाळासाहेब मुखेकर, अर्जुन शिरसाठ, उषाताई बनकर, बाबासाहेब खरात,अनिल भवार, उच्च अधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव फुंदे,जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली मुळे,उत्तर विभाग प्रमुख साहेबराव टफळे अरविंद घोडके,दक्षिण विभाग प्रमुख विजय नरवडे किशोर माकुडे आदी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या कोल्हापूर व सांगली शिक्षक बँकांच्या निवडणुकीमध्ये नगर शिक्षक बँकेच्या चांगल्या कारभाराचे दाखले दिल्याचे यावेळी मंडळाचे जिल्हा सरचिटणीस विजय ठाणगे यांनी सांगितले .
विरोधी मंडळांनी पाच वर्षे पूर्ण सेवा न राहिलेले अनेक उमेदवार दिल्यामुळे त्यांचे मंडळ चांगलेच अडचणीत आल्याचे मंडळाचे कोषाध्यक्ष ना.चि. शिंदे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत