सन १९८५ साली राहुरीत भर पावसात पार पडली होती ऊस उत्पादक परिषद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सन १९८५ साली राहुरीत भर पावसात पार पडली होती ऊस उत्पादक परिषद

  आज ६ ऑक्टोबर२०२२ ६ ऑक्टोबर १९८५रोजी राहुरी जि, अहमदनगर येथे पहिली अ. भा. ऊस उत्पादक परिषद संपन्न झाली. या ऐतिहासिक परिषदेसाठी सुमारे दोन ल...

 


आज ६ ऑक्टोबर२०२२

६ ऑक्टोबर १९८५रोजी राहुरी जि, अहमदनगर येथे पहिली अ. भा. ऊस उत्पादक परिषद संपन्न झाली. या ऐतिहासिक परिषदेसाठी सुमारे दोन लाख  शेतकरी महिला पुरुषांचा जनसमुदाय उपस्थित होताच पण दिडतास भर पावसात भिजत, शांत बसून सभेतील वक्त्यांची ओजस्वी भाषणे जिवाचे कान करुन ऐकत होता. सभेला संबोधित करण्यासाठी दिवंगत पंतप्रधान स्व. चरणसिंग चौधरी, स्वामी अग्निवेश, प्रमोदजी महाजन, भास्करभाऊ बोरावके, विजयदादा जावंधीया, मनजीतसिंग मान, अनिल अण्णा गोटे आणि शेतकऱ्यांचे दोन शरद.... मा. श्री शरद पवार आणि स्व. श्री शरद जोशी मंचावर उपस्थित होते!    .... संपर्क, दळणवळण साधनांचा अभाव, मोबाईल सारख्या प्रसिद्धी साधनांचा तर लवलेश नव्हता. प्रचार केवळ वृत्तपत्रीय बातम्या आणि एक छोटी समर्पक जाहिरात, आणि गावोगावच्या भिंतीवर चुना व गुरुने लिहीलेल्या शेतकरी संघटनेच्या घोषणा वाचून ...नेत्यांवरील असाधारण निष्ठेच्या  बळावर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी, माय बहीणी... मिळेल त्या साधनाने, स्वखर्चाने, स्वतः ची दोन दिवसांची शिदोरी सोबत घेऊन पंढरीस जाण्याच्या श्रद्धेने राहुरीत दाखल झाले होते. विदर्भातील शेतकरी तर रेल्वे डब्यात जागा नाही म्हणून त्या डब्यावर बसून येत होते. संध्याकाळी भाडोत्री आणलेल्या ट्रक, टेम्पो च्या आडोश्याला तीन दगडांच्या चुली मांडून पिठलंभाकरीचा स्वयंपाक करणाऱ्या मातामाऊल्या आणि ते सहभोजनाच्या आगळ्या तृप्तीचे  दृष्य आज तीनतपांचा काळ उलटला तरी विसरु शकत नाही.  मित्रांनो, तो जोष, तो होश, आणि देवासमान नेत्यांवर ची अढळ श्रद्धा अलौकिक होती.!!!     **काल ५आक्टोबर २०२२रोजी  सर्व सुखसोयींनी समृद्ध असणाऱ्या  मुंबई महानगरात  विजयादशमी चे औचित्य साधून शक्तिप्रदर्शन करणारे दोन मेळावे संपन्न झाले.!... वृत्तपत्रातील सप्तरंगी पानभराच्या जाहिराती, टिव्ही वाहिन्यांवर रात्रंदिवस बातम्या, जाहिराती, मुलाखतींचा महापूर पाहिला, कोट्यावधी रुपयांचा धुर करुन उभी केलेली वाहतूक व्यवस्था, नाष्टा जेवणाच्या सोयी  आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे  हे बहुचर्चित  प्रचंड.. अती प्रचंड मेळावे  पाहिले! ऐकले!!.... या दोन्ही मेळाव्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याला काय दिले? कोणाचा विजय किंवा पराजय झाला?... हे आकलनशक्ती बाहेरचे आहे.!!   मित्रांनो, ३७ वर्षांपूर्वी ६आक्टोबर१९८५च्या  राहुरी येथील भर पावसात, शांततेत, संपन्न झालेल्या ऐतिहासिक शेतकरी परिषदेमुळे.... तेव्हा पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या केंद्र शासनाने दखल घेऊन ऊस दरात वाढ करण्यासाठी सक्तीच्या""लेव्ही साखर ""धोरणात मुलभूत बदल करुन पहिले पाऊल टाकले होते. या निर्णयामुळे ऊसाला प्रतिटनी३००रुपयांच्या आसपास घोटाळणारा भाव ४५०/५००पर्यंत पोहचला होता.!!!वाद..वादंगात न पडता स्व. राजीव गांधी यांनी शेतकऱ्यां प्रतीची आत्मियता दाखवली होती.   केवळ शेतकरी हित नजरेसमोर ठेवून राज्यकर्त्या पक्षात असुनही स्व. वसंतदादा पाटील, स्व. खासदार बाळासाहेब विखे पाटील, गोविंदराव आदिक, स्व. दादासाहेब तनपुरे, श्री प्रसादराव तनपुरेआदींनी पडद्याआड राहून सक्रीय सहकार्याची भूमिका निभावली होती, हे विशेष! आजही शेतकऱ्यांना दरवर्षी ऊस दरासाठी उग्र आंदोलन करावे लागते. प्रसंगी रक्त सांडावे लागते.. तो इतिहास वेगळाच आहे..... मुंबई च्या दोन्ही मेळाव्यांनी  नेमके काय दिले? शेतकरी पुत्र असलेले शिवसैनिक सुद्धा संभ्रमात पडले आहेत.

सुधाकर कराळे, देवळाली प्रवरा, अहमदनगर.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत