राहुरी(वेबटीम) तालुक्यातील कोंढवड येथील जि. प. शाळेच्या वर्ग खोल्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून लवकर काम सुरू करण्यात या...
राहुरी(वेबटीम)
तालुक्यातील कोंढवड येथील जि. प. शाळेच्या वर्ग खोल्यांच्या कामाची निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून लवकर काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपा युवा तालुका उपाध्यक्ष शरद म्हसे यांनी कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, अहमदनगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोंढवड, ता. राहुरी) येथील विषयांकित कामाची निविदा दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.
सदर कामाचे टेंडर भरण्याची मुदत संपली असून या कामासाठी ५ निविदाधारक आले असून दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी निविदा उघडण्यात आली आहे. त्याबाबत पुढे कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.
तरी सदर कामाची निविदा ही लवकरात लवकर ओपन करुन सदर कामाची निविदा प्रक्रिया पारदर्शक व्हावी. तसेच सदर कामाची सुरुवात लवकर करावी, अशी मागणी देखील शरद म्हसे यांनी केली आहे.
प्राथमिक शाळेत खोल्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना बसण्याची जागा अपुरी पडत आहेत. याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत आहे. याबाबत पालकांनी वारंवार तक्रारी करूनही खोल्यांचे बांधकाम करण्यास संबंधित विभाग टाळटाळ करीत असल्याचे शरद म्हसे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत