आंबी(वेबटीम) श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर -उक्कलगांव दरम्यान प्रवरा नदिपात्रात केशव गोविंद बना जवळ एक अनोळखी इसमाचा सडलेला मृतदेह आढळून आल...
आंबी(वेबटीम)
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर -उक्कलगांव दरम्यान प्रवरा नदिपात्रात केशव गोविंद बना जवळ एक अनोळखी इसमाचा सडलेला मृतदेह आढळून आला. त्यामुळे या घटनेने परिसरात खळबळ उडाली. हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले असता त्याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान घटनास्थळी पो.नि. गवळी, हे.कॉ. लोटके, पोलीस कर्मचारी भिंगारदे, बडे, केसापूरचे पोलीस पाटील विशाल पवार आदींनी भेट देऊन पंचनामा केला.
हा तरुण कोण? कुठला? तो पाण्यात कधी बुडाला? का त्याची हत्या करून मृतदेह प्रवरा नदीत फेकण्यात आला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मयताच्या अंगावर निळ्या रंगाची पॅन्ट दिसत असून चेहरा सडून कवटी उघडी पडलेली दिसत आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलीस उशिरापर्यंत करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत